दीपा परबची तू चाल पुढं' मालिकेत अशी लागली वर्णी, या अभिनेत्रीचा आहे यात मोलाचा वाटा; म्हणाली..,

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 07:00 AM2022-08-11T07:00:00+5:302022-08-11T07:00:07+5:30

अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परब 'तू चाल पुढं' मालिकेतून जवळपास १० वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली याबाबत तिने खुलासा केलाय.

Actress Harshada Khanvilkar suggest Deepa Parab's name for Tu Chal Pudh serial | दीपा परबची तू चाल पुढं' मालिकेत अशी लागली वर्णी, या अभिनेत्रीचा आहे यात मोलाचा वाटा; म्हणाली..,

दीपा परबची तू चाल पुढं' मालिकेत अशी लागली वर्णी, या अभिनेत्रीचा आहे यात मोलाचा वाटा; म्हणाली..,

googlenewsNext

झी मराठीवर (Zee Marathi) अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. नव्या मालिकांसह जुने कलाकार पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपा परब ( Deepa Parab). दीपा परबनं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र गेली अनेक वर्ष ती मराठी टेलिव्हिजनवर ती दिसली नाही. मात्र यादरम्यान तिनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत हिंदी टेलिव्हिजनवर आपली नवी ओळख निर्माण केली. आता पुन्हा एकदा दिपा मोठ्या गॅपनंर मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.  झी मराठीवरील नवी मालिका 'तु चाल पुढं' ( Tu Chal Pudh)मध्ये दीपा परब मुख्य  भूमिकेत झळकणार आहे. 

'तू चाल पुढं' या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब- चौधरी जवळपास दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. या मालिकेत ती अश्विनीच्या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी अश्विनीला पाहिलं.

या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना दीपा म्हणाली कि, " झी मराठी कडून मला फोन आला. अभिनेत्री हर्षदा खानविलकरने माझे नाव ह्या भूमिकेसाठी टीमला सुचवले. खरंतर कमबॅक करण्यासाठी मी वाटच पाहत होती आणि संधी चालून आल्यावर ती मी लगेच स्वीकारली. माझी अश्विनी हि भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, समस्या, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेते. नवीन घर तयार व्हावं व त्यात आपलं हि योगदान असावं असा विचार करून ती स्वबळावर पैशाची बचत करते. मला विश्वास आहे कि, अश्विनी हि व्यतिरेखा प्रत्येक घरातील महिलेला आपलीशी वाटेल.  

Web Title: Actress Harshada Khanvilkar suggest Deepa Parab's name for Tu Chal Pudh serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.