ढोल-ताशांचा नाद, पतीचा डान्स अन् शेजाऱ्यांनी काढली दृष्ट, जान्हवी किल्लेकरचं ग्रँड फिनालेनंतर जंगी स्वागत

By देवेंद्र जाधव | Published: October 7, 2024 09:42 AM2024-10-07T09:42:03+5:302024-10-07T09:44:22+5:30

जान्हवी किल्लेकरचं बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर घरी आल्यावर जंगी स्वागत (jahnavi killekar, bigg boss marathi 5)

actress jahnavi killekar grand welcome after bigg boss marathi 5 grand finale | ढोल-ताशांचा नाद, पतीचा डान्स अन् शेजाऱ्यांनी काढली दृष्ट, जान्हवी किल्लेकरचं ग्रँड फिनालेनंतर जंगी स्वागत

ढोल-ताशांचा नाद, पतीचा डान्स अन् शेजाऱ्यांनी काढली दृष्ट, जान्हवी किल्लेकरचं ग्रँड फिनालेनंतर जंगी स्वागत

बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले काल पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली. या ग्रँड फिनालेमध्ये टॉप ६ स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकर सुद्धा सहभागी होती. जान्हवीने सहाव्या नंबरवर ९ लाख रुपयांची पैशांची बॅग घेऊन खेळ सोडला. जान्हवीच्या निर्णयाचं सगळीकडे खूप कौतुक होतंय. अशातच ग्रँड फिनालेनंतर रात्री घरी आल्यावर जान्हवीचं तिच्या सोसायटीतील रहिवाश्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं.

जान्हवीचं सोसायटीतील लोकांकडून जंगी स्वागत

जान्हवी किल्लेकर ग्रँड फिनालेनंतर तिच्या घरी आल्यावर ढोल-ताशांच्या गजरात जान्हवी आणि तिच्या पतीने डान्स केला. यावेळी सोसायटीमधील जान्हवीचे शेजारीही उपस्थित होते. सर्वांसोबत जान्हवीने जल्लोष साजरा केला. डान्स करता करता जान्हवी भावुक झालेली दिसली. पुढे जान्हवीने तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी शेजाऱ्यांनी तिचं औक्षण करुन अभिनंदन केलं. याशिवाय एका शेजारी महिलेने जान्हवीची प्रेमाने दृष्ट काढली. अशाप्रकारे ग्रँड फिनालेनंतर घरी आल्यावर जान्हवीचं जंगी स्वागत करण्यात आलं.


 


जान्हवीने सहाव्या नंबरवर बिग बॉस खेळ सोडला

 काल बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये रितेशने सुरुवातीला ७ लाखांची ऑफर घेऊन खेळ सोडण्याची ऑफर स्पर्धकांना दिली. ही ऑफर सर्व स्पर्धकांनी नाकारली. पण, त्यानंतर पुन्हा रितेशने रक्कमेत आणखी २ लाख वाढवले आणि ९ लाख ऑफर केले. यानंतर मात्र, जान्हवीने आपला निर्णय बदलला आणि ट्रॉफी सोडून पैशांची बॅग उचलली. यावेळी जान्हवी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणाली, "मी 'बिग बॉस'च्या घरात मोठ्यांचा अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्र नाराज झाला. त्यामुळे भीती वाटतेय. एक प्रायश्चित्त म्हणून मी पैशांची बॅग उचलत आहे." जान्हवीच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होतंय

 

Web Title: actress jahnavi killekar grand welcome after bigg boss marathi 5 grand finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.