जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 09:27 AM2024-10-26T09:27:05+5:302024-10-26T09:27:27+5:30
जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार का? (jahnavi killekar)
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन काहीच दिवसांपूर्वी संपला. या सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत बिग बॉसचा पाचवा सीझन चांगलाच गाजवला. या सीझनमध्ये चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवीने बिग बॉसचा खेळ गाजवत टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. सध्या जान्हवी चांगलीच चर्चेत आहे कारण, तिच्याबद्दल अशी बातमी पसरली की, ती बिग बॉसमध्ये वापरलेल्या कपड्यांचा लिलाव करणार. अखेर जान्हवीने याविषयी मौन सोडलंय.
जान्हवी कपड्यांच्या लिलावाबद्दल काय म्हणाली?
जान्हवीने सोशल मीडियावर खुलासा करुन सांगितलं की, "माझ्याबद्दलची एक अफवा वाचली. ती बातमी म्हणजे जान्हवी किल्लेकर करणार बिग बॉसच्या घरातील १०० ड्रेस आणि ४० नाईट ड्रेसचा मी लिलाव करणार आहे. काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मी घेतलेत १०० कपडे आणि ४० नाईट ड्रेस. मग काय झालं? मी हे कपडे पुढेही वापरेन. मी त्याचा लिलाव का करेन. माझी अशी विनंती आहे की, अशा कोणत्याही अफवा पसरवू नका."
जान्हवी शेवटी विनंती करत म्हणाली की, "मला माझे असे कोणतेही कपडे विकायचे नाहीयेत. हे कपडे विकण्यासारखे नाहीयेत. मी का माझे कपडे विकू? हे कपडे फार काही महागडे नाहीयेत. त्यामुळे guys उगाच काहीही अफवा पसरवू नका, ही माझी विनंती." अशाप्रकारे जान्हवीने खरा खुलासा केला. जान्हवी बिग बॉसनंतर विविध सिनेमांच्या प्रमोशन इव्हेंटला हजेरी लावताना दिसतेय. जान्हवीच्या नव्या मालिकेची किंवा सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.