“२० वर्षांपासून वडिलांना भेटले नाही”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी दुसरं लग्न केल्यावर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 01:50 PM2023-08-12T13:50:48+5:302023-08-12T13:51:18+5:30
Bigg Boss OTT : “जेव्हा कोणी माझ्या वडिलांबद्दल विचारतं...", 'वेड' फेम अभिनेत्री भावुक
‘वेड’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री जिया शंकर ‘बिग बॉस ओटीटी’ दुसर्या पर्वात सहभागी झाली होती. ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी जिया एक होती. परंतु, तिला ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घ्यावा लागला. जियाने ‘बिग बॉस’च्या घरात तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. वडिलांच्या आठवणीत जिया ‘बिग बॉस’च्या घरात भावुक झालेली पाहायला मिळाली.
‘बिग बॉस’च्या घरात एल्विश यादवशी बोलताना जियाने तिच्या वडिलांबाबत खुलासा केला होता. २० वर्षांपासून वडिलांशी बोलले नसल्याचं जियाने सांगितलं होतं. यावर एल्विशने तिला “वडिलांबरोबर बोलायला आवडत नाही का?” असं विचारलं होतं. यावेळी जियाने नाही असं उत्तर दिलं होतं. “आम्ही एकमेकांशी बोलत नाही. ते कुठे आहेत हेही मला माहीत नाही. गेल्या २० वर्षांपासून आम्ही बोललेलो नाही. त्यांचा आमच्याशी काहीच संपर्क नाही. मी त्यांचा आवाजही ऐकला नाहीये. त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर ते त्यांची दुसरी पत्नी आणि मुलीबरोबर राहतात. ते आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. ते आमची चिंता कशाला करतील? माझ्या वडिलांनी आमच्याबद्दल जाणून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यांना काही फरक पडत नाही,” असं जिया म्हणाली.
"विचारधारा जुळत नसली तरी पक्ष फोडून सत्तेत...", राजकारणावर वैभव मांगले स्पष्टच बोलले
“जेव्हा कोणी माझ्या वडिलांबद्दल विचारतं तेव्हा काय बोलायचं हे मला कळत नाही. दुसऱ्या कुटुंबाना मी एकत्र बघते तेव्हा त्यांच्या नसण्याची जाणीव होते. मी लहान होते तेव्हा कोणी काही बोलल्यावर मी वडिलांकडे त्याची तक्रार करायचे. ते माझी खूप काळजी घ्यायची. जेव्हा मला असुरक्षित वाटतं तेव्हा मला त्यांची आठवण येते,” असंही जियाने सांगितलं.
जियाने छोट्या पडद्यापासून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘मेरी हानिकारक बीवी’, ‘पिशाचिनी’, ‘काटेलाल एण्ड सन्स’ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. ‘व्हर्जिन भास्कर’ या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटामुळे जियाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.