पस्तीशी ओलांंडली तरीही लग्न नाही केलं? प्रश्नावर जुईने स्पष्ट सांगितलं की, "सध्या जो तणाव..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:21 PM2024-03-21T19:21:35+5:302024-03-21T19:21:58+5:30
जुई गडकरीने लोकमत फिल्मीशी बोलताना लग्न न करण्याबद्दल तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. काय म्हणालीी बघा
जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जुई सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अभिनय करत आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने पस्तीशी ओलांडली तरीही लग्न नाही केलं? विषयावर तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. जुई म्हणाली, "याच्यापुढं माझं लग्न होऊन माझी मुलंबाळं कधी होतील हा विचार मी रोज करत असते. पण यातून मी सकारात्मक गोष्टी बघते. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. ज्या काही गोष्टी घडल्यात त्या माझ्या मर्जीनुसार घडल्यात. माझं लग्नही देवाच्या मर्जीनुसार घडणार आहे. आणि हे जेव्हा त्याच्या मर्जीनुसार होईल तेव्हा ते बेस्टच असेल."
जुई पुढे म्हणाली, "मला पुर्वीच्या गोष्टी एकाबाबतीत खुप पटायच्या की, वेळेत लग्न, वेळेत मुलबाळ त्यामुळे तुम्ही सेटल होता. ही गोष्ट खुप चांगली होती पण तेव्हाचा जमाना पण वेगळा होता. सध्याच्या काळात मुलींना ज्या पद्धतीचा तणाव आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अशा अनेक गोष्टींमुळे मुलगा - मुलगी दोघांमध्ये इनफर्टिबिलीटी वाढणं कठीण झालंय. आणि त्याचं मुलींना प्रेशर असतं."
जुई पुढे म्हणते, "आपल्याकडे मानलं जातं की, स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मुलबाळ होतं. मग त्या स्त्रियांनी काय करावं ज्यांना मुलं होत नाहीत? ती स्त्री नाहीय का? तिच्यात मातृत्व नाहीय का? तर तसं नाहीय. आणि या गोष्टी मी खुप ऐकल्या आहेत की, पस्तीशी ओलांडली तरी लग्न नाही? असा प्रश्न विचारतात. पण माझी फॅमिली खुप सपोर्टिव्ह आहे. माझ्या फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे."