शाळेत क्रशला बघून काजल म्हणायची हे गाणं, खुलासा करत म्हणाली- मी त्याच्यासाठी....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 06:07 PM2023-07-17T18:07:45+5:302023-07-17T18:13:07+5:30

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत काजलने तिच्या क्रशबाबत खुलासा केला.

Actress kajal kate of majhi tuji reshimgath fame revealed about her school crush | शाळेत क्रशला बघून काजल म्हणायची हे गाणं, खुलासा करत म्हणाली- मी त्याच्यासाठी....

शाळेत क्रशला बघून काजल म्हणायची हे गाणं, खुलासा करत म्हणाली- मी त्याच्यासाठी....

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath). या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते.  या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेऊन बरेच महिने झाले असले तरी या मालिकेतील पात्र आजही रसिकांच्या मनात घर करुन कायम आहे. या मालिकेतील शेफालीच्या भूमिकेतून अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) घराघरात पोहचली. दरम्यान काजल काटे हिने नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे.

यावेळी तिला शाळेत कोणता मुलगा आवडायचा का असा मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना काजल म्हणाली, हो आवडायचा पण आता तो कुठंय माहिती नाही. मी त्यावेळी त्याच्यासाठी एक सुद्धा म्हणायचं असे ती म्हणाली. 'कसम की कसम है कसम से हम को प्यार है सिर्फ तुमसे' हे गाणं ती म्हणायची असं तिने सांगितलं. 

दरम्यान काजल काटेचं लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव प्रतिक कदम असून तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये प्रतिक कदम प्रशिक्षक म्हणून काम पाहतो. काजल काटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'शेफालीची भूमिका तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली असं तिने सांगितलं होतं. लोक मला आता ओळखू लागले आहेत. मला मेसेजेस, फोनद्वारे प्रेक्षक प्रतिक्रिया देतात. आमच्या आयुष्यातही शेफालीसारखी एक तरी मैत्रीण असावी अशी प्रतिक्रिया मिळते तेव्हा खूप आनंद होत असल्याचे काजलने सांगितले होते. ती सध्या मुरांबा मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे.  तसेच तिच्या नाटकांचे प्रयोगही सुरु आहेत. 
 

Web Title: Actress kajal kate of majhi tuji reshimgath fame revealed about her school crush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.