दुस-यांदा लग्न करणार ही टीव्ही अभिनेत्री, या तारखेला करणार आयुष्याची नवी सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 15:25 IST2019-11-21T15:22:06+5:302019-11-21T15:25:50+5:30
काही दिवसांपूर्वी काम्याने शलभसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. सोशल मीडियावर आपले रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर काम्या सर्रास शलभसोबतचे फोटो शेअर करत असते.

दुस-यांदा लग्न करणार ही टीव्ही अभिनेत्री, या तारखेला करणार आयुष्याची नवी सुरूवात
टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी बॉयफ्रेंड शलभ डांगसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. काम्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शलभसोबत लग्न कधी करणार यावर प्रश्नचिन्ह होते. आता खुद्द काम्यानेच तिच्या लग्नाची तारिख सांगितली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच 10 फ्रेब्रुवारी 2020 मध्ये काम्या बॉयफ्रेंड शलभसह लग्न करणार आहे. काम्याने शलभसह फोटो शेअर करत तिच्या लग्नाची तारिख चाहत्यांसह शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. माझ्या आयुष्याची नवीन सुरूवात करत असून तुमचा आशिर्वाद असू द्या अशीही कॅप्शन तिने दिली आहे.
काम्याचे प्रिवेडींग फंक्शन 9 फेब्रुवारीपासून सुरू होतील. विशेष म्हणजे गुरूद्वारामध्ये या दोघांचे लग्न होणार आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारीला काम्या मित्र मंडळी आणि जवळच्या नातेवाईकासांठी एका ग्रँड पार्टीचे आयोजनही करणार आहे. कुटुंबाच्या सहमतीनेच लग्नाचा निर्णय घेतला असून आता आम्ही जास्त दिवस एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे लग्न करत आयुष्याची सुंदर सुरूवात करण्याचा निर्णय घेतल्याचे ती सांगायला विसरली नाही.
लग्नानंतर तिचे खास हनीमून प्लॅनही आहेत. मात्र वेळ आल्यावर हनीमून डेस्टीनेशन सांगणार असल्याचेही तिने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी काम्या पंजाबीने शलभसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. सोशल मीडियावर आपले रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर काम्या सर्रास शलभसोबतचे फोटो शेअर करत असते.
शलभही काम्यासोबतचे फोटो शेकर करतो. असाच एक फोटो त्याने शेअर केला. पण यावेळी हा फोटो पाहून एका ट्रोलरने काम्यावर पर्सनल अटॅक केला. या युजरचा पर्दाफाश करत, काम्याने त्याच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला. काम्याचा बॉयफ्रेन्ड शलभनेही या युजरचा चांगलाच क्लास घेतला होता.