अभिनेत्री मोना सिंह पडली प्रेमात, लवकरच करणार लग्न ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 11:22 AM2019-09-07T11:22:06+5:302019-09-07T11:23:27+5:30

योग्य वेळ आल्यावर मोना लग्न करणार असल्याचेही तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.

Actress Mona Singh fall in love, soon to be married? | अभिनेत्री मोना सिंह पडली प्रेमात, लवकरच करणार लग्न ?

अभिनेत्री मोना सिंह पडली प्रेमात, लवकरच करणार लग्न ?

googlenewsNext


'जस्सी जैसी कोई नही' मालिकेतून प्रकाशझोतात आली मोना सिंह तुम्हाला आठवत असेलच.  ‘3 इडियट्स’ आणि ‘उटपटांग’ मध्येही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. मोना सिंह आता तिच्या आयुष्याची नवीन सुरूवात करण्यास सज्ज झाली आहे. लग्न करणार असल्याच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ती कोणाच्या तरी प्रेमात आहे. मात्र ज्या व्यक्ती बरोबर ती रिलेशनशिपमध्ये आहे त्या व्यक्तीबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. 


याआधी करण ओबोरॉय आणि बॉलीवुड अभिनेता विद्धयुत जामवाल यांच्याबरोबरही अफेअर होते. मात्र ते फार काळ काही टिकले नाही आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. तुर्तास  लग्नाबाबतच्या तिच्या या खुलाशामुळे जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणांचा जीव भांड्यात पडेल, नाही का? तर दुसरीकडे मोनाच्या लग्नाच्या चर्चांमुळे फॅन्स खूश झाले असणार हे मात्र नक्की. 

तसेच मोनाने तिच्या रिलेशिपबाबत सध्यातरी मौनच बाळगणे पसंत केले आहे. आता पुन्हा एकदा मोना प्रेमात पडलीय. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर ती लग्न करणार असल्याचेही तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. हिंदी सिनेमामध्ये चांगल्या पटकथांची कमतरता असल्याचे तिला वाटते. मोना म्हणते, ‘आपण जे चित्रपट पाहतो, त्यापैकी बरेचसे रोमँटिक असतात. मी रोमँटिक चित्रपटांच्या विरोधात नाही; पण सिनेमा म्हणजे फक्त एवढेच नाही, असे मला वाटते.’ 

Web Title: Actress Mona Singh fall in love, soon to be married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.