"तो वाईट निर्माता असून.."; मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मृणालने तीन वर्षांनी मौन सोडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 10:42 AM2024-04-28T10:42:17+5:302024-04-28T10:43:04+5:30
अखेर भारतात परतल्यावर एका मुलाखतीत मृणाल दुसानिसने मंदार देवस्थळी पैसे थकबाकी प्रकरणावर तिचं स्पष्ट मत सांगितलंय (mrunal dusanis, mandar devasthali)
अभिनेत्री मृणाल दुसानीस सध्या भारतात आहे. अनेक वर्षांनी मृणालने हे मन बावरे मालिकेत मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मौन सोडलंय. २०२१ साली मंदार यांनी हे मन बाबरे मालिकेतील कलाकारांचे पैसे थकवले. त्यावेळी अभिनेता शशांक केतकरने याविरोधात आवाज उठवला होता. आता ३ वर्षानी मृणालने याविषयी मौन सोडून तिला आलेला अनुभव सांगितलाय.
मृणालने सेलिब्रिटी कट्टा चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की, "तो चांगला दिग्दर्शक पण वाईट निर्माता आहे. मी त्या मालिकेत अगदी मनापासून काम केले. तेव्हा माझे वडील आजारी होते. मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असले तरी मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकले नाही. मी चांगले काम पण फक्त एकट्याचे पैसे देऊन काही होत नाहीत. त्यांनी इतरांचे अर्धे पैसे तरी द्यायला हवे होते."
मृणाल पुढे म्हणाली, "आता या पुढे मी आर्थिक गोष्टींवर अजून बारकाईने लक्ष देणार आहे. सगळ्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये अशी परिस्थिती नसते. मला या आधी असा अनुभव आला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूप शॉकिंग होता. मला अनेकांनी ही मालिका करण्याआधी अलर्ट केलं होतं. पण मी तेव्हा ऐकलं नाही. ही एक गोष्ट सोडली तर तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याने माझी पहिली ऑडिशन घेतली होती."
मृणाल शेवटी म्हणाली, "आता या घटनेबाबत बोलून काहीच फायदा नाही. कारण, जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं. मी त्या मालिकेत अतिशय
मनापासून काम केलं होतं. माझे बाबा तेव्हा आजारी होते. मी त्यांना वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते. मी फारच नाजूक मनस्थितीत
होते कारण, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता."