लग्नाच्या वाढदिवशी नम्रताच्या नवऱ्याने केली तिच्या खास सवयीची पोलखोल, काय म्हणाला बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:14 IST2024-05-13T17:13:27+5:302024-05-13T17:14:15+5:30
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावला तिच्या पतीने खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात (maharashtrachi hasyajatra, namrata sambherao)

लग्नाच्या वाढदिवशी नम्रताच्या नवऱ्याने केली तिच्या खास सवयीची पोलखोल, काय म्हणाला बघा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. नम्रताला आपण विविध सिनेमांमधून पाहिलंय. नम्रताचा नुकताच 'नाच गं घुमा' सिनेमा रिलीज झालाय. 'नाच गं घुमा'ला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. नम्रताने सिनेमात साकारलेल्या आशाताईंच्या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक होतंय. नम्रताच्या लग्नाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने तिचा पती योगेशने तिच्या एका खास सवयीचा उल्लेख केलाय. जी कदाचित तुम्हाला माहित नसेल.
नम्रताचा पती योगेश संभेरावने त्या दोघांचे खास फोटो पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करुन योगेश लिहितो, "तुझ्या सिनेमांची इतकी टेरिबल आवड आहे तरीही आपण एकत्र आहोत याचं मला आश्चर्य वाटतं." अशाप्रकारे लग्नाच्या वाढदिवशी नम्रताचा नवरा योगेशने तिच्या खास सवयीची पोलखोल आहे. पुढे योगेशने हे कॅप्शन डिलीट करुन बदलल्याचंही निदर्शनास आलं.
नम्रतानेही योगेशसोबतचा खास व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन दिलंंत पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. अशाप्रकारे नम्रता आणि योगेश या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. नम्रता - योगेश यांना रुद्राज हा मुलगा आहे. नम्रता अनेकदा सोशल मीडियावर तिचा पती आणि मुलासोबतचे गोड क्षण शेअर करत असते.