अभिनेत्री प्रिया मराठे दिसणार या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 01:58 PM2024-07-05T13:58:31+5:302024-07-05T13:58:59+5:30

अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ती एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Actress Priya Marathe will be seen in this series, playing a negative role | अभिनेत्री प्रिया मराठे दिसणार या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका

अभिनेत्री प्रिया मराठे दिसणार या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका

अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ती एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्याने मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत प्रिया मराठे खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. रागिणी अग्निहोत्री असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. 

प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते ? ते मालिकेत पहाता येणार आहे. रागिणीच्या  येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार? गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार?  हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण कसं खरं उतरणार? याची रंजक कथा मालिकेत पहायला मिळणार आहे.   

या भूमिकेबद्दल प्रिया सांगते की, जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.


‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. “नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची..! कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Actress Priya Marathe will be seen in this series, playing a negative role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.