देवकीपाठोपाठ ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई; डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 16:27 IST2022-11-25T16:20:05+5:302022-11-25T16:27:11+5:30
प्रेग्रेंन्सी ग्लो अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

देवकीपाठोपाठ ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई; डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल
कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत असतील. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे रूपाली झंकार(Rupali Zankar). रुपलीने गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.
सध्या रूपाली तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. दरम्यान रूपालीचं डोहाळे जेवण नुकतंच पार पडलं. या दरम्यानचा फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. प्रेग्रेंन्सी ग्लो रुपालीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. रुपालीचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. सध्या तो ‘पिंकीचा विजय असो’( Pinki Cha Vijay Aso) मालिकेत युवराजची मुख्य भूमिका साकारतो आहे. अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar) आणि रुपाली लवकरच आईबाबा होणार आहेत. विजय आणि रुपाली दोघेही बाळाच्या स्वागतासाठी खूप खुश आहेत.
रुपाली आणि विजयची भेट झी मराठीवरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ या मालिकेच्या सेटवर झाली. यात रुपालीनं काजोलची तर विजयनं मदनची भूमिका साकरली होती. विजय आंदळकरने वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, 702 दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपट आणि मालिकेतून तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला होता. बहुतेक चित्रपट आणि मालिकेतून तो नकारात्मक भूमिका देखील साकारताना दिसला आहे.