अभिनेत्री सई देवधरचा महिलांसाठी अनोखा उपक्रम, चाहते करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:09 PM2022-12-29T18:09:50+5:302022-12-29T18:10:13+5:30

Sai Deodhar : मातृत्वाला प्राधान्य देऊन कामापासून दूर राहणे कसे असते याचा सई देवधरला प्रत्यक्ष अनुभव आहे. तिचे मूल मोठे होत असताना तिने चार वर्षे काम बंद ठेवले होते. मात्र, कामावर असलेल्या प्रेमामुळे ती सेटवर परत आली.

Actress Sai Deodhar's unique initiative for women, fans praise | अभिनेत्री सई देवधरचा महिलांसाठी अनोखा उपक्रम, चाहते करताहेत कौतुक

अभिनेत्री सई देवधरचा महिलांसाठी अनोखा उपक्रम, चाहते करताहेत कौतुक

googlenewsNext

कोरोनामुळे पुरुषांच्या तुलनेत अधिक स्त्रियांना काम सोडावे लागले हे तथ्य आहे. उडान व सारा आकाश यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई देवधर (Sai Deodhar) हिने या समस्येची दखल घेतली आणि खंडानंतर स्त्रियांना काम पुन्हा सुरू करणे सोपे नसते पण ते अशक्यही नसते असे तिला कळून चुकले. स्त्रियांना खंडानंतर काम पुन्हा सुरू करण्यास मदत करणे, उत्तेजन देणे व प्रेरणा देणे यांसाठी सईने स्त्रियांसाठीचे सोशल कम्युनिटी अॅप असलेल्या कोटोवर बॅकटूवर्क ही कम्युनिटी तयार केली. येथे ती आपले अनुभव शेअर करू इच्छिणाऱ्या स्त्रियांसोबत संवाद साधणार आहे आणि पुन्हा काम सुरू करण्यासाठी स्त्रिया एकमेकींना सहाय्य करणार आहेत. ही कम्युनिटी काम पुन्हा सुरू करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्याचे व त्यांवर उपाय शोधण्याचे स्थळ म्हणून काम करेल तसेच काम व आयुष्य यांच्यात समतोल कसा राखायचा यावरही येथे चर्चा होईल. 

मातृत्वाला प्राधान्य देऊन कामापासून दूर राहणे कसे असते याचा सई देवधरला प्रत्यक्ष अनुभव आहे. तिचे मूल मोठे होत असताना तिने चार वर्षे काम बंद ठेवले होते. मात्र, कामावर असलेल्या प्रेमामुळे ती सेटवर परत आली. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे, तर एक लेखिका, फिल्ममेकर व निर्माती म्हणूनही तिने काम केले! तिला आपल्या आवडीचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी तिच्या नवऱ्याने व कुटुंबाने अविश्वसनीयरित्या पाठिंबा दिला हे सई मान्य करते आणि हा पाठिंबा प्रत्येक स्त्रीला मिळेलच असे नाही याचीही तिला कल्पना आहे. मातृत्वाची जबाबदारी पार पाडण्यात मग्न असताना स्त्रियांनी स्वत:ला विसरू नये व आपली क्षमता खऱ्या अर्थाने उपयोगात आणावी असे सईला वाटते.

“मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर गोष्ट आहे,” असे सई सांगते. मातृत्व आपल्याला पूर्णत्व देते. मात्र, मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळेच स्त्रिया काम बंद करतात हेही लक्षात घेतले पाहिजे. मातृत्वानंतर काही स्त्रियांचे आयुष्य कायमस्वरूपी बदलून जाते, त्यांच्यापैकी बऱ्याच जणी पुन्हा काम सुरूच करू शकत नाहीत. कुटुंबियांचा पाठिंबा न मिळणे, अनेक वर्षांच्या खंडानंतर निरुपयोगी किंवा कालबाह्य झाल्यासारखे वाटणे, एम्प्लॉयरच्या बाजूने पुरेसा विश्वास न दाखवला जाणे किंवा संधी न दिल्या जाणे आणि डगमगलेला आत्मविश्वास ही यामागील काही कारणे असतात.”

ती पुढे म्हणते, “काम पुन्हा सुरू करणे हे आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी तसेच एक व्यक्ती म्हणून वाढण्यासाठी व विकास होण्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. आपण एक आई म्हणून आपल्या मुलांसाठी प्राधान्यक्रम लावण्याचे व आपल्या आनंदासाठी गोष्टींची निवड करण्याचे उदाहरण घालून दिले पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून, मी  ‘BACK2WORK’ ही माझी कम्युनिटी कोटोवर तयार केली आहे. स्त्रियांमधील अनंत संभाव्यता खुल्या करण्यासाठी ही कम्युनिटी तयार केली आहे.”

Web Title: Actress Sai Deodhar's unique initiative for women, fans praise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.