मराठमोळी अभिनेत्री विकते तिचे जुने कपडे ? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 17:15 IST2021-08-28T17:14:06+5:302021-08-28T17:15:10+5:30
कपडे विक्रीतून आलेली रक्कम अनाथाश्रमाला मदत करणार असल्याचं सईनं सांगितलं आहे. सई लोकुरने सुरु केलेल्या या उपक्रमाचेही विशेष कौतुक होत आहे.

मराठमोळी अभिनेत्री विकते तिचे जुने कपडे ? जाणून घ्या कारण
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी त्यांचे महागडे कपड्यांचा लिलाव करत सामाजिक कार्य करताना दिसतात. मराठी सेलिब्रेटीदेखील त्यांच्या कपड्यांचा लिलाव करत आहेत. अभिनेत्री सई लोकुरनेही तिच्या कपड्यांचा लिलाव करत असल्याचे समोर आले आहे. सई लोकुरने तिच्या कपड्यांचा लिलाव करायचा निर्णय घेतलाय.
सई लोकुरनं या कपड्यांची विक्री करण्यासाठी सोशल मीडियावर तिने हा उपक्रम सुरु केलाय. यासाठी तिने स्पेशल पेजही तयार केले आहे. याविषयी तिने सगळी यापेजवर यासंदर्भात माहिती देण्यात येते. कपडे विक्रीतून आलेली रक्कम अनाथाश्रमाला मदत करणार असल्याचं सईनं सांगितलं आहे. सई लोकुरने सुरु केलेल्या या उपक्रमाचेही विशेष कौतुक होत आहे.
कोरोना लॉकडाऊन दरम्यानही सई चाहत्यांशी सोशल मिडियाद्वारे संवाद साधत होती. या काळात येणार ताणताणाव, नैराश्य यातून बाहेर पडण्यासाठी ती चाहत्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन करत होती. सकारात्मक उर्जा देणारे टीप्स देताना दिसली होती. सई फारशी अभिनयात न रमता लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली.
तीर्थदीप रॉयसोबत लग्न करत संसासर थाटलाय. त्यानंतर दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. सईचे पती तीर्थदीप रॉयसोबतचे अनेक रोमँटीक फोटो पाहायला मिळतात. दोघांचीही केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडते. सई सोशल मीडियावर वेगवेगळ्या एक्टीव्हीटी करत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
‘मराठी बिग बॉस’ मुळे सई लोकुर प्रकाशझोतात आली होती. या शोमुळे तिला खरी ओळख मिळाली. हा शो रसिकांना चांगलाच भावला होता. मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच चर्चेत आले होते. त्यातील सई लोकूरनेही शोमध्ये आपल्या कामगिरीने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या शोमुळेच स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सई लोकूर 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी सिनेमात देखील झळकली आहे. या सिनेमात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सिनेमातल्या तिची भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.