संभावना सेठच्या वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार,उपचारादरम्यानचा बेजबादारपणा केला उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:46 PM2021-05-22T19:46:28+5:302021-05-22T19:50:13+5:30
संभावना सेठने रुग्णालयात कशाप्रकारे उपचार केले जातात असा प्रश्न उपस्थित करत रुग्णालयचा गलथानपणा समोर आणला आहे.
वाढत्या करोना रुग्णांमुळे ऑक्सिजन, बेडस्, औषधांचा तुडवडा निर्माण झालाय. अशात रुग्णांचेही हाल होत आहे. वेळीच त्यांना उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुरेशा व्यवस्था नाही. सर्वसामान्याप्रमाणे सेलिब्रेटींना देखील त्यांच्या जवळच्या व्यक्तींना वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना गमवावे लागले आहे. आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणाच अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांच्या मृत्युला जबाबदार गंभीर आरोप तिने केला आहे.
अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. जेव्हा त्यांची प्रकृती खालावत जात होती. तेव्हा आयसीयुमध्ये एडमिट करण्यासाठी बेडही उपलब्ध नव्हते. शेवटी सोशल मीडियावर तिने मदत मागितली होती. अखेर ९ मे रोजी त्यांचे निधन झाले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप संभावना सेठने केला आहे. वडिलांच्या उपचारादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत संभावनाने रुग्णालयाचा कशारितीने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे हीच बाब समोर आणली आहे.
उपचारादरम्यान संभावना सेठ रुग्णालयातल्या कर्मचा-यांना जाब विचारताना दिसत आहे. यावर कोणीही तिला समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही. डॉक्टर आणि नर्स कोणीही संभावनाच्या प्रश्नाला उत्तर देत नाही.संभावनाने रुग्णालयात गोंधळ घातला. कशारितीने तिच्या वडिलांवर उपचार केले जात आहे. हे व्हिडीओच्या माध्यमातून तिने सगळ्यांसमोर मांडले आहे.
संभावनाने रुग्णालयात कशाप्रकारे उपचार केले जातात असा प्रश्न उपस्थित करत रुग्णालयचा गलथानपणा समोर आणला आहे.जयपूर गोल्डन रुग्णालयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. या व्हिडीओत तिने तिच्या वडिलांचा मृत्यू हा मेडिकल मर्डर असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या दोन तासानंतरच तिच्या वडिलाचं निधन झालं. उपचाराच्या नावाने त्यांची हत्याच केल्याचा आरोप संभावनाने केला आहे.