'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:49 PM2021-09-08T12:49:51+5:302021-09-08T12:50:19+5:30

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

The actress from the series 'Tujyaat Jiv Rangala' started a new business | 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती सोनावणे आठवते आहे ना. तिने नुकतेच स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दीप्ती सोनावणेने चंदाची भूमिका साकारली होती. या मालिकेत नंदिता गायकवाड अर्थात वहिणीसाहेबांची ती पाठराखीण बनून गायकवाड कुटुंबात दाखल झाली होती. वहिनीसाहेब आणि चंदा राणा आणि अंजलीला त्रास देताना दिसले होते. त्यामुळे मालिकेतील या दोन्ही खलनायिका चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या.

चंदा म्हणजेच दीप्ती सोनवणेने चला हवा येऊ द्या च्या सेलेब्रिटी पॅटर्न या मंचावरून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. मालिकेत येण्याअगोदर दीप्तीने नाटकात काम केले होते.


दीप्तीने अभिनय आणि नृत्याचे धडे गिरवले असल्याने आता अभिनया सोबतच ती डान्सची आवड तिच्या नव्या व्यवसायातून जोपासताना दिसणार आहे.

दीप्तीने पुण्यातील पाषाण परिसरात स्वतःच्या नावाने दिप्स अ‍ॅक्टिंग अँड डान्स अकॅडमी सुरू केली आहे. या अकॅडमीतून विद्यार्थ्यांना नृत्याचे तसेच अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत. सोबतच या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना नाटकातून काम करण्याची नामी संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभिनयाचे नऊ रस, वाचिक अभिनय , मुकाभिनय या सर्वांचे बारकावे शिकवले जाणार आहेत. तर नृत्यामध्ये बॉलिवूड, साल्सा, झुंबा हे डान्स फॉर्म तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. 

View this post on Instagram

A post shared by Dipti S Actress 🎥💕🎥 (@dips2455)


दीप्ती सोनवणे ही पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर अभिजित सोनवणे यांची सख्खी बहीण आहे. पुण्यातील रस्त्यावर, मंदिराजवळ बेवारसपणे जी लोक बसलेली असतात त्यांच्यावर हे डॉक्टर मोफत उपचार करताना दिसतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल अनेक वृत्त माध्यमांनी देखील घेतलेली आहे.

Web Title: The actress from the series 'Tujyaat Jiv Rangala' started a new business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.