"माझे केस आता.."; जुळ्या मुलांच्या जन्मानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:21 IST2025-04-06T17:19:33+5:302025-04-06T17:21:59+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री जुळ्या मुलांच्या जन्मानंतर एका गंभीर समस्येला तोंड देत आहे

"माझे केस आता.."; जुळ्या मुलांच्या जन्मानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, फोटो केला शेअर
प्रेग्नंसीच्या काळात अभिनेत्रींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वाढलेलं वजन, डिप्रेशन अशा गंभीर आजारांचाही अनेकदा अभिनेत्री सामना करताना दिसतात. अशातच टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन तिला होणारा त्रास सर्वांना सांगितला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे श्रद्धा आर्या. श्रद्धाने (shraddha arya) काहीच महिन्यांपूर्वी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. त्यानंतर सध्या श्रद्धाने तिला कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागतंय, याचा खुलासा केलाय.
श्रद्धाला सतावत आहे ही समस्या
नुकतीच श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयी खुलासा केलाय. जु्ळ्या मुलांच्या डिलिव्हरीनंतर श्रद्धाला केसगळतीच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय.श्रद्धाने सोशल मीडियावर याविषयीचा फोटो शेअर करुन सर्वांना हा त्रास सांगितला आहे. "हे खरंच आहे. डिलिव्हरीनंतर केसांची गळती होते", अशा शब्दात श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाचा खुलासा केलाय. श्रद्धाने काहीच महिन्यांपूर्वी लग्नाच्या तीन वर्षांनंतर जुळ्या बाळांना जन्म दिला.
श्रद्धाच्या बाळांचं नाव आहे खूप खास
श्रद्धाने २९ नोव्हेंबर २०२४ ला तिच्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने तिच्या जुळ्या मुलांची झलक दाखवली होती. श्रद्धाला कन्यारत्न आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. "दोन चिमुकल्यांनी आमचं कुटुंब पूर्ण केलं. आमचं हृदय आनंदाने भरुन गेलं आहे", असं कॅप्शन श्रद्धाने या व्हिडिओला दिलं. १ एप्रिल २०२५ ला घिबीला स्टाईलमध्ये श्रद्धाने तिच्या बाळांच्या नावाचा खुलासा केला. श्रद्धाने मुलाचं नाव शौर्य ठेवलं असून मुलीचं नाव ठेवलंय सिया.