‘इश्कबाज’ फेम श्रेनू पारिखलाही कोरोना, रूग्णालयात सुरु आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:50 AM2020-07-15T11:50:34+5:302020-07-15T11:51:44+5:30

श्रेनूने स्वत: इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली.

actress shrenu parikh tested corona positive recovering in the hospital | ‘इश्कबाज’ फेम श्रेनू पारिखलाही कोरोना, रूग्णालयात सुरु आहेत उपचार

‘इश्कबाज’ फेम श्रेनू पारिखलाही कोरोना, रूग्णालयात सुरु आहेत उपचार

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘कसौटी जिंदगी की 2’चा लीड हिरो पार्थ समथान यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असताना आता अभिनेत्री श्रेनू पारिख हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. श्रेनूने स्वत: इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली.
‘काही दिवसांपूर्वी मला कोरोनाची लागण झाली. सध्या मी रूग्णालयात असून माझ्यावर उपचार सुरु आहेत. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या. मी कोरोना वॉरियर्सची आभारी आहे, जे या भयावह काळात रूग्णांवर उपचार करत आहेत. पुरेपूर काळजी घेतल्यानंतरही कोरोना होत असेल तर हा अदृश्य राक्षस किती भयावह आहे याची कल्पना करा. कृपा करून काळजी घ्या. स्वत:चा बचाव करा,’असे श्रेनूने लिहिले आहे.

श्रेनू ही टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. ‘भ्रम-सर्वगुण संपन्न’ या मालिकेत ती झळकली होती. या मालिकेत श्रेनू निगेटीव्ह भूमिकेत होती. यानंतर इश्कबाज, इस प्यार को क्या नाम दूं, दिल बोले ओबेरॉय, ब्याह हमारी बहु का अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

श्रेनूआधी ‘कसौटी जिंदगी की 2’चा लीड हिरो पार्थ समथान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. तो पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ‘कसौटी जिंदगी की 2’चे शूटींग काही काळ स्थगित करण्यात आले आहे. पार्थला कोरोनाची लागण झाल्यावर त्याचे सहकलाकार आमना शरीफ, पूजा बॅनर्जी, करण पटेल, शुभावी चौकसी आदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ‘कसौटी जिंदगी की 2’ची एरिका फर्नांडिस हिच्या चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

बॉलिवूडमध्येही कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. अलीकडे अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व आराध्या बच्चन अशा चौघांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ व अभिषेक यांच्यावर नानावटी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: actress shrenu parikh tested corona positive recovering in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.