"ब्रेनस्ट्रोक आला, बोलताही येईना..", मराठी अभिनेत्याची झाली होती दयनीय अवस्था, पत्नी म्हणाली-या कठीण काळात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:26 AM2023-10-09T11:26:09+5:302023-10-09T11:29:57+5:30
सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक एक दिवस अभिनेत्याला आजारानं घेरलं.
मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक रिअल लाईफ जोड्या आहेत. यापैकीच एक जोडी म्हणजे राहुल मेहेंदळे आणि श्वेता मेहेंदळे यांची. राहुल आणि श्वेता दोघेही सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत काम करत आहेत.श्वेता या मालिकेत इंद्रायणी हे नकारात्मक भूमिका साकारत आहे. दरम्यान एका मुलाखती दरम्यान दोघांनी राहुलला काही वर्षांपूर्वी झालेल्या आजाराबाबत भाष्य केलं.
श्वेता आणि राहुल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. दोघे अनेकवर्ष इंडस्ट्रीत सक्रिय आहे. राहुलला काही वर्षांपूर्वी ब्रेक स्ट्रोक आला होता. यावर दोघांनी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ कार्यक्रमात खुलासा केला. राहुल रुग्णालयामध्ये असताना श्वेता तिच्या कामामध्ये व्यग्र होती. पण तिच्यासाठीही हा संपूर्ण काळ कठीण होता.
श्वेता म्हणाली, माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचं शूटिंग सुरु होतं. तसेच माझ्या नाटकाची तालीमही सुरु होती. त्यावेळी माझं पुण्यात दोन कार्यक्रम होतं. मी पुण्याला दुपारी पोहोचले आणि मला बाबांचा फोन आला की, राहुलला रुग्णालयामध्ये दाखल केलं. संध्याकाळी माझा पुण्यात कार्यक्रम होता. मी रडत होते. मला त्या कार्यक्रमामधील लोकांशीही बोलता येत नव्हतं. तिथे मी कसं सगळं केलं हेच मला कळत नव्हतं”.
पुढे श्वेता म्हणाली, ''या कठीण काळात राहुलचे बाबा, भाऊ आणि संपूर्ण कुटुंब आमच्या पाठिशी भक्कमपण उभं राहिलं. मला राहुलसोबत रुग्णालयात थांबायलाही वेळ नव्हता. माझ्या डोक्यात एकच विचार होता हा अभिनेता म्हणून या आजारातून पुन्हा कसा उभा राहिल का हा एकच प्रश्न होता. कारण त्याला नीट बोलताही येत नव्हता. पण तो या आजारातून पुन्हा उभा राहिला.'' आज राहुल या आजारावर मात करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.