धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 08:58 AM2024-06-07T08:58:44+5:302024-06-07T08:59:15+5:30

श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरी चोरी झाली आहे. यामध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

actress shweta shinde satara house theft 10 lakhs and cash gone by theif | धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास

धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास

मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरी दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरी चोरी झाली आहे. यामध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. श्वेता शिंदेच्या घरातील तब्बल १० तोळं सोनं चोराने लंपास करत काही पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे. चोरी केल्यानंतर चोराने घरातील कपाटही जाळल्याचं समोर आलं आहे. सोमवारी(३ जून) रात्री ही घटना घडली आहे.  याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

श्वेता शिंदे तिच्या आईबरोबर साताऱ्यातील पिरवाडी या ठिकाणी राहते. कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलेल्या श्वेता शिंदेच्या घरी चोरांनी दरोडा टाकला. माध्यमांशी बोलताना श्वेताने याबाबत माहिती दिली. "सोमवारी रात्री ३ जूनला माझ्या घरी दरोडा पडला. साधारणत: १० तोळे सोने आणि काही पैसे चोरले आहेत. नक्की किती मालमत्ता गेली ते माहीत नाही. पण, आईच्या जे काही लक्षात होतं ते तिने सांगितलं. नशीब त्यावेळी आई घरात नव्हती. त्यामुळे तिला काही झालं नाही. आताच मी DCP साहेबांना भेटले. साताऱ्यातील पोलीस यंत्रणा सशक्त  आहे. त्यामुळे नक्कीच यावर कारवाई होईल, असा मला विश्वास आहे," असं श्वेताने सांगितलं. 

अभिनेत्री असण्याबरोबरच श्वेता निर्मातीदेखील आहे. तिची निर्मिती असलेली 'लागिर झालं जी' ही मालिका प्रचंड गाजली. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेची निर्मितीही तिनेच केली आहे. याशिवाय तिची 'लाखात एक आमचा दादा' ही नवी मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: actress shweta shinde satara house theft 10 lakhs and cash gone by theif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.