अभिनेत्री स्मिता बन्सल ह्या भूमिकेसाठी थांबली दोन वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 10:38 AM2018-07-28T10:38:20+5:302018-07-28T10:44:07+5:30

'नजर' या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Actress Smita Bansal stayed for two years in the role | अभिनेत्री स्मिता बन्सल ह्या भूमिकेसाठी थांबली दोन वर्ष

अभिनेत्री स्मिता बन्सल ह्या भूमिकेसाठी थांबली दोन वर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देस्मिता बन्सलचे दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅकस्मिता बन्सल दिसणार दिव्या नामक आईच्या भूमिकेत

 

छोट्या पडद्यावर विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री स्मिता बन्सल स्टार प्लस वाहिनीवरील आगामी मालिका 'नजर'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेतील भूमिकेसारख्या कामाच्या मी दोन वर्षे प्रतिक्षेत होते, असे स्मिताने सांगितले.

'नजर' या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखविण्यात आले आहे. यात स्मिता बन्सलने दिव्या नामक भूमिका साकारली असून ती आपल्या नवऱ्यापासून विभक्त झालेली असून पियाची आईच्या रोलमध्ये दिसणार आहे. या मालिकेत काम करण्यास खूप उत्सुक असल्याचे स्मिता सांगते व ती पुढे म्हणाली की, 'या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी मी खूपच उत्साहात आहे कारण मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन विचार करता येतो. अशा प्रकारची भूमिका करण्यासाठी मी २ वर्षे थांबले आहे. ही भूमिका खूपच खास आणि रोचक आहे. या शोची संकल्पना खूप वेगळी असून याआधी सुपरनॅचरल ह्या प्रकारात मी कधीच काम केले नाही. दिव्याच्या व्यक्तिरेखेची वैशिष्ट्‌ये आणि तिचा आकर्षकपणा मला खूप आवडला. यापूर्वी कधीच मी अशा अवतारात दिसले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच माझी भूमिका आवडेल,अशी आशा आहे. 'नजर'मध्ये काम करताना मला खूप छान वाटते आहे आणि २ वर्षांच्या प्रतीक्षेचे फळ मला निश्चितपणे मिळाले आहे.'
 'नजर' या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत डायनाच्या भूमिकेत अभिनेत्री मोनालिसा बिस्वास दिसणार आहे. ही मालिका ३० जुलैपासून रात्री ११ वाजता स्टार प्लस वाहिनीवर पाहता येणार आहे.

Web Title: Actress Smita Bansal stayed for two years in the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.