दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्मृती खन्नाने पचवलंय मिसकॅरेजचं दु:ख; म्हणाली, 'आई होण्याचा माझा निर्णय..'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:11 AM2024-04-22T09:11:48+5:302024-04-22T09:12:16+5:30
Smriti khanna: स्मृती खन्ना दुसऱ्या आई होणार आहे. मात्र, त्यापूर्वी तिने तिचं एक बाळ गमावलं आहे.
'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्री आणि लाइफस्टाइल इन्फ्लुएन्सर स्मृती खन्ना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्मृती आणि गौतम गुप्ता यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या स्मृती तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. मात्र, आई होण्याचा तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. स्मृतीने यापूर्वी मिसकॅरेजसारख्या दु:खाचा सामना केला आहे. अलिकडेच तिने तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये याविषयी खुलासा केला.
"माझ्या प्रेग्नंसीचे चार महिने पूर्ण झाले असून नुकताच मला पाचवा महिना लागला आहे. माझ्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा भाग आहे. इन्स्टाग्रामवर माझे फोटो पाहून लोकांना वाटत असेल की माझं आयुष्य खूप छान आणि परफेक्ट आहे. पण, जेव्हा मी छान दिसते तेव्हा लगेच फोटो क्लिक करुन घेते. आनंदाचे क्षण मी कैद करायचा प्रयत्न करते. मी माझे रडके व्हिडीओ कशाला पोस्ट करु? मात्र, मी बराच स्ट्रगल केला आहे. एक वेळ तर अशी आली होती की दुसरं बाळ नाही झालं तरी चालेल. पण, मी कधी हार मानली नाही. मला दुसरं बाळ माझ्या मुलीसाठी अनायकासाठी हवं आहे. माझ्या मुलीला एक भाऊ किंवा बहीण असावी असं वाटतं", असं स्मृती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "अनायका आणि दुसऱ्या बाळाच्या वयात फार अंतर नसावं असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. माझी पहिली प्रेग्नंसी व्यवस्थित झाली. पण, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्ये खूप त्रास झाला. मी प्रेग्नंट राहिले पण त्याचवेळी माझं मिसकॅरेज झालं. कदाचित त्यामागे मानसिक कारणदेखील असून शकेल. कारण, तेव्हा माझ्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरु होते आणि दोन महिन्याने माझं मिसकॅरेज झालं. तो काळ खरंच खूप कठीण होता. त्यानंतर पुन्हा वर्षभराने मी प्रेग्नंट राहिले. मी IVF द्वारे प्रेग्नंट राहिले. पण तो प्रवास खूप कठीण होता. मला दररोज ठराविक वेळेवर एक इंजक्शन घ्यावं लागत होत. पण, ही टेस्टही फेल गेली. IVF चाचणीद्वारे आई होण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. तुम्ही त्यावेळी हा पर्याय निवडू शकता ज्यावेळी तुम्ही नॅच्युअरली कंसिव्ह करु शकत नाही. माझ्या केसमध्ये तसं नव्हतं."
दरम्यान, त्यानंतर स्मृती आणि गौतमने पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी स्मृती प्रेग्नंट तर झाली मात्र तिला ऑटोइम्यून डिसऑर्डरचं निदान झालं. ज्यामुळे तिला दररोज असंख्य औषध, स्टेरॉइड घ्यावे लागले. ज्यामुळे तिचं वजन कमालीचं वाढलं होतं. इतकंच नाही तर या सगळ्यामुळे तिच्या प्रेग्नंसीचे पहिले ३ महिने प्रचंड जोखमीचे आणि काळजीत गेले. इतकंच नाही तर या काळात तिला ब्लिडिंगचीही समस्या सुरु झाली होती. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने ३-४ दिवस बेड रेस्ट घेतल्यावर तिची समस्या दूर झाली, असंही तिने सांगितलं.