Ek Veer Ki Ardaas Veera मालिकेनंतर 'Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh'या ऐतिहासिक मालिकेत झळकणार अभिनेत्री स्नेहा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2017 07:36 AM2017-01-25T07:36:34+5:302017-01-25T13:08:40+5:30

'शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये शरद केळकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे तर 'क्योंकी साँस भी कभी बहु थी' ...

Actress Sneha Wagh will be seen in the historic series 'Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh' after 'Ek Veer Ki Ardaas Veera' series | Ek Veer Ki Ardaas Veera मालिकेनंतर 'Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh'या ऐतिहासिक मालिकेत झळकणार अभिनेत्री स्नेहा वाघ

Ek Veer Ki Ardaas Veera मालिकेनंतर 'Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh'या ऐतिहासिक मालिकेत झळकणार अभिनेत्री स्नेहा वाघ

googlenewsNext

'शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये शरद केळकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे तर 'क्योंकी साँस भी कभी बहु थी' फेम आकादीप सैगलही याच मालिकेव्दारे पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. आता आणखी एका कालाकार याच मालिकेच्यामाध्यमातून दीड वर्षानी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. होय, 'एक वीर की अरदास: वीरा' या मालिकेतील आईच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्नेहा वाघ आता दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.लाईफ ओकेवरील ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या मालिकेत स्नेहा महाराजा रणजितसिंग यांच्या आईची भूमिका साकारणार आहे. पण तिचा या भूमिकेशी आणखी एक समान धागा आहे,याची कलपना फारशी कुणाला नसेल.स्नेहाने तिच्या आधीच्या मालिकेत एका पंजाबी मातेची भूमिका साकारली होती. आता ‘शेर-ए- पंजाब’ मालिकेतही ती एका पंजाबी मातेची, महाराजा रणजितसिंग यांची आई राज कौर यांची भूमिका साकारणार आहे. 

ही एक महत्त्वाची भूमिका आहे.तिच्या पतीचे निधन झाल्यावर राज कौरने एकटीने रणजितसिंग यांना वाढविले होते. आपल्या भूमिकेबाबत स्नेहा म्हणाली, “प्रथमच कोणीतरी महाराजा रणजितसिंग यांच्या जीवनावर मालिका तयार करीत आहे. मालिकेची संकल्पना आणि त्यातील व्यक्तिरेखांमध्ये एक ताजेपणा आहे आणि त्यांच्याबाबत पूर्वीची काही माहिती नाही. मला ही भूमिका फार आवडली असून पुन्हा एकदा पंजाबी माता आणि पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे.”या मालिकेचे कर्मचारी आणि कलाकार यांनी चित्रीकरणाला प्रारंभ केला असून पंजाबचा इतिहास कथन करणार्‍या आणि दूरदृष्टी ठेवणारे राजा महाराजा रणजितसिंग यांच्याशी संबंधित असलेल्या या मालिकेशी निगडित असल्याचा त्यांना अभिमान वाटत आहे.

Web Title: Actress Sneha Wagh will be seen in the historic series 'Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh' after 'Ek Veer Ki Ardaas Veera' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.