'सूर नवा ध्यास नवा'फेम मॉनिटर आठवतोय का? त्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखाल का त्याला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 14:56 IST2023-09-17T14:55:45+5:302023-09-17T14:56:37+5:30
Harshad naybal: ‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’ या पर्वातील मॉनिटर हर्षद नायबळ याने कलाविश्वासह सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली.

'सूर नवा ध्यास नवा'फेम मॉनिटर आठवतोय का? त्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखाल का त्याला?
छोट्या पडद्यावरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला मॉनिटर म्हणजे हर्षद नायबळ. उत्तम बालसूत्रसंचालक, बालकलाकार आणि तितक्याच सुंदर पद्धतीने पोवाडा सादर करण्याच्या कलेमुळे हर्षद अल्पावधीत लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर त्याच्या हजरजबाबीपणामुळे त्याने दिग्गज कलाकारांचंही मनं जिंकलं. परंतु, या कार्यक्रमानंतर तो फारसा कुठे दिसला नाही. त्यामुळे तो काय करतो किंवा कसा दिसतो असा प्रश्न अनेकांना पडतो. यामध्येच अभिनेत्री स्पृहा जोशी हिने त्याचा एका फोटो शेअर केला आहे.
‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’ या पर्वातील मॉनिटर हर्षद नायबळ याने कलाविश्वासह सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्याच्याविषयी वरचेवर चर्चा रंगत असते. अलिकडेच स्पृहाने तिच्या इन्स्टाग्रामवर हर्षदसोबतचा फोटो शेअर केला त्यामुळे या लाडक्या मॉनिटरला पाहून सगळेच खूश झाले.
“हा आधीच मोठा झाला आहे. काही बॉण्ड कधीही बदलत नाहीत", असं कॅप्शन देत स्पृहाने हा फोटो शेअर केला. फोटोत दिसणारा हर्षद आता चांगलाच मोठा झाला आहे. त्यामुळे चाहते आता पुन्हा एकदा त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.