सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 01:55 PM2023-04-18T13:55:08+5:302023-04-18T13:56:25+5:30

Sulbha deshpande: सुलभा देशपांडेची सुनदेखील अभिनेत्री असून 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत करतीये काम

actress sulbha deshpande son and daughter in law also actors | सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका

सुलभा देशपांडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतोय मुख्य भूमिका

googlenewsNext

एकेकाळी मराठी कलाविश्वावर सुलभा देशपांडे (sulbha deshpande) या नावाचा दबदबा होता. अनेक सिनेमांमध्ये प्रेमळ आई, आजीची भूमिका साकारुन त्या लोकप्रिय झाली. सुलभा देशपांडे यांचं निधन होऊन आज बराच काळ झाला. मात्र, त्यांच्या दर्जेदार अभिनयामुळे आजही त्या प्रेक्षकांमध्ये जीवंत आहे. त्यामुळे वरचेवर त्यांची चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलाची आणि सुनेची चर्चा रंगत आहे.

सुलभा देशपांडे यांच्या कुटुंबातील जवळपास सारेच लोक कलाविश्वात सक्रीय आहेत. अगदी त्यांच्या बहिणीपासून ते सुनेपर्यंत अनेक जण दिग्गज कलाकार आहेत. म्हणूनच, त्यांच्या सुनेविषयी आणि लेकाविषयी आज जाणून घेऊयात.

सुलभा देशपांडे यांचा लेकाचं नाव निनाद देशपांडे असं असून त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. निनाद यांनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघाच्या वडिलांची म्हणजेच प्रदीपरावांची भूमिका साकारली आहे. 

दरम्यान, सुलभा देशपांडे यांची सूनदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या सुनेचं नाव आदिती देशपांडे असं असून त्या सध्या  फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत जिजी आक्काची भूमिका साकारत आहेत. सुलभा देशपांडे या मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी 'चौकट राजा', 'हापूस', 'विहीर', 'जैत रे जैत', 'आज्जी आणि नात', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'अवताराची गोष्ट', 'थोडं तुझं थोडं माझं'  यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: actress sulbha deshpande son and daughter in law also actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.