सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली 'दिल के करीब' असलेली गोष्ट; शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:04 AM2024-05-21T09:04:15+5:302024-05-21T09:04:28+5:30

Sulekha talwalkar: सुलेखा तळवलकरांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

actress-sulekha-talwalkar-bought-new-car-shares-video-on-social-media | सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली 'दिल के करीब' असलेली गोष्ट; शेअर केला व्हिडीओ

सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली 'दिल के करीब' असलेली गोष्ट; शेअर केला व्हिडीओ

सध्याचा काळ अनेक मराठी कलाकारांसाठी लकी ठरतोय. अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नवीन घरी गृहप्रवेश केलाय. तर, काहींनी आलिशान गाड्यांची खरेदी केली आहे. यामध्येच अनिता दाते, चेतना भट, संतोष जुवेकर या कलाकारांनंतर अभिनेत्री सुलेखा तळवलकर (Sulekha talwalkar) यांच्याही घरी नव्या कोऱ्या गाडीचं आगमन झालं आहे.

'दिल के करीब' या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत त्यांना बोलत करणाऱ्या सुलेखा तळवलकर यांनी नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे. अलिकडेच त्यांनी त्यांच्या कारच्या ओपनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

“माझं गाड्यांवर असलेलं प्रेम! ड्रायव्हिंग ही माझी आवड आहे आणि गाड्या म्हणजे माझं प्रेम, माझा वीक पॉइंट. साड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा गाड्यांचं वॉर्डरोब असावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळेच आमच्या कुटुंबात आता आम्ही आणखी एक सदस्य जोडला आहे. वेलकम होम…तुझी आम्ही खूप काळजी घेऊ. ही पोस्ट करायला थोडा उशीर झाला. पण, तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद,” असं कॅप्शन देत सुलेखाने तिच्या नव्या गाडीची झलक दाखवली.

दरम्यान, सुलेखा तळवलकर यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्याच माध्यमामध्ये काम केलं आहे. त्यामुळे कलाविश्वात त्यांचा सक्रीय वावर असल्याचं पाहायला मिळतो. कधी नायिका तर कधी खलनायिका अशा प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सध्या त्या मुरांबा या मालिकेत सीमा मुकादम ही भूमिका साकारत आहेत.

Web Title: actress-sulekha-talwalkar-bought-new-car-shares-video-on-social-media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.