"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:08 PM2024-04-23T17:08:31+5:302024-04-23T17:09:08+5:30

अभिनेत्री सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित कोठारे व्हिजनच्या मालिकेचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाल्या सुरेखा बातमीवर क्लिक करुन वाचा (surekha kudachi)

actress surekha kudachi emotional post for pinkicha vijay aso serial | "कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच

"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच

अभिनेत्री सुरेखा कुडची या गेल्या अनेक महिन्यांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. सुरेखा यांनी आजवर विविध मालिका आणि सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सुरेखा सध्या पिंकीचा विजय असो मालिकेत काम करत होत्या. या मालिकेतील सुरेखा यांच्या भूमिकेचा प्रवास आता संपला आहे. त्यानिमित्ताने सुरेखा यांनी पोस्ट लिहिली आहे. सुरेखा लिहितात, "Last day of shoot …. म्हणता म्हणता ७ महिने कसे निघून गेले कळल ही नाही …  सुनील तावडे, अंकीता, विजय आंदळकर, आरती मोरे स्टार प्रवाह या सगळ्यांसोबत खूप मज्जा आली काम करायला.

सुरेखा पुढे लिहितात, "खर तर ही बाकी सगळी मंडळी गेल्या दोन वर्षांपासून एकत्र काम करताहेत… मला वाटलं आपल्याशी जुळवून घेतील ना पण खरच खूप मोठ्या मनाने माझ स्वागत झाल … मी त्यांचातली कधी झाले हे कळलच नाही … कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका .. खूप छान वाटल आपल्या सोबत काम करुन …
स्टार प्रवाह बद्दल मी काय बोलाव बस नाम ही काफी है… देवयानी पासून सातत्याने काम दिलय मला … खूप खूप धन्यवाद …."

अशाप्रकारे सुरेखा यांनी पिंकीचा विजय असो मालिकेचा निरोप घेतला आहे. सुरेखा मालिकेत देवयानी ही खलनायिका साकारत होत्या. या भूमिकेमुळे सुरेखा यांना खूप प्रेम मिळालं. याशिवाय सुरेख बिग बॉस मराठी 3 मध्येही सहभागी होत्या. फॉरेनची पाटलीण, पहिली शेर - दुसरी सव्वाशेर - नवरा पावशेर अशा सिनेमांमध्ये सुरेखा कुडची यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या.

Web Title: actress surekha kudachi emotional post for pinkicha vijay aso serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.