"माझी नजर त्या सुंदर दृश्यावरुन...", स्वानंदी टिकेकरने दिली ताजमहलला भेट; अनुभव सांगत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:45 IST2025-02-12T10:42:24+5:302025-02-12T10:45:05+5:30
स्वानंदी टिकेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

"माझी नजर त्या सुंदर दृश्यावरुन...", स्वानंदी टिकेकरने दिली ताजमहलला भेट; अनुभव सांगत म्हणाली...
Swanandi Tikekar:स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. याशिवाय स्वानंदीने काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे.अलिकडेच स्वानंदीने नवीन घर खरेदी केलं. त्यामुळे ती चर्चेत आली होती. सध्या अभिनेत्री कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच स्वानंदीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
स्वानंदी टिकेकर सध्या तिचा क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसते आहे. नुकतीच अभिनेत्रीने आग्रा येथील प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहालला पहिल्यांदा भेट दिली. याबाबत आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत तिने लिहिलंय की, "ताजमहल कॅमेऱ्यात कैद करण्याची माझी इच्छा नव्हती कारण माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं किंवा माझ्या मनाला जे काही साठवलं त्याच्या तुलनेत ते काहीही नव्हतं."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "माझी नजर त्या सुंदर दृश्यावरुन हटतच नव्हती आणि जेव्हा मी बाहेर पडत होते तेव्हा मी दर काही सेकंदांनी मागे वळून पाहत होते. येथील प्रत्येक कोपऱ्यात माझं मन जणू भ्रमंती करत होतं. पण, एक माणूस म्हणून, मी या सुंदर क्षणांना जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझा हा प्रयत्न केवळ अपयशी ठरला." अशी पोस्ट शेअर करत स्वानंदीने ताजमहल भेटीचा अनुभव शेअर केला आहे.
दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. स्वानंदीचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्यांने कमेंट करत म्हटलंय, "खुपच छान..." तर आणखी एका यूजरने प्रतिक्रिया देत हार्ट इमोजी शेअर केला आहे.