'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीने घेतला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:55 PM2021-12-25T12:55:11+5:302021-12-25T12:55:49+5:30

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

The actress took a break from the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीने घेतला ब्रेक

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून या अभिनेत्रीने घेतला ब्रेक

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत शालिनी वहिनी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे. शालिनी सध्या मालिकेत वेडी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, ती खरोखरच वेडी झाली आहे की ती नाटक करत आहे, याबाबतचा खुलासा अजून व्हायचा आहे. असं समजते आहे की, या मालिकेतून माधवी निमकर (Madhavi Nimkar) काही काळासाठी ब्रेक घेणार आहे.

माधवी निमकर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून काही दिवसासाठी ब्रेक घेणार असल्याचे सांगण्यात येते. कारण की माधवी ही पावनखिंड या चित्रपटात दिसणार आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला माधवी दिसली नाही तर काळजी करू नका. ती लवकरच मालिकेत पुन्हा पाहायला मिळेल.

मालिकेत सध्या दादासाहेब घर सोडून गेले आहेत. दादासाहेब गौरीला तिच्या वडिलांचा खून त्यांच्याच हातून चुकून होतो असे सांगतात. गौरीकडे कबुली दिल्यानंतर दादासाहेब घर सोडून जातात. गौरी माईला सगळं सांगते. पण माई दादासाहेबांवर गौरीने आरोप केला आणि त्यामुळे घर सोडून गेले असे म्हणतात. गौरीवर माई खूप नाराज होतात. ते तिला सून म्हणून नाकारतात. त्यामुळे गौरी आता पुन्हा मोलकरणीच्या भूमिकेत आली आहे. त्यामुळे दादासाहेब घरी कधी येतील आणि गौरीवर लागलेले आरोप कधी दूर होतील, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: The actress took a break from the series 'Sukh Mhanje Nakki Kay Asata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.