Uma Maheshwari Death: जमिनीवर पडली अन् काही क्षणात जीव गेला; अभिनेत्रीच्या निधनानं कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:34 IST2021-10-18T14:33:43+5:302021-10-18T14:34:26+5:30
शांती विलियम्स म्हणाल्या की, उमा मागील काही महिन्यापासून कावीळ आजाराने पीडित होती असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यावर उपचार सुरू होते.

Uma Maheshwari Death: जमिनीवर पडली अन् काही क्षणात जीव गेला; अभिनेत्रीच्या निधनानं कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
नवी दिल्ली – वेळ कधी कुणावर सांगून येईल सांगता येणं कठीण आहे. मागील काही दिवसांपासून अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी जगाचा निरोप घेतला. यातच आता आणखी एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. ४० वर्षीय अभिनेत्री उमा माहेश्वरी(Uma Maheshwari) हिचं रविवारी अचानक निधन झालं. मृत्यूच्या काही मिनिटं अगोदर ती जमिनीवर कोसळली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरीला खूप अस्वस्थ जाणवत होतं. तामिळ टीव्ही शो मेट्टी ओलीमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या शांति विलियम्सनं या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. शांतीने उमाच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटलंय की, उमा माहेश्वरी माझ्या मुलीसारखी होती. तिच्या मृत्यूच्या बातमीनं मला धक्का बसला. देव इतक्या कमी वयात लोकांना का घेऊन जातो हे माहिती नाही. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा अनेकदा देवाच्या अस्तित्वावर संशय येतो. अभिनेत्री चित्रा वीजे काही महिन्यापूर्वी आम्हाला सोडून गेली. ती घटना विसरत नाही तोवर अचानक उमा माहेश्वरीही आमच्यातून निघून गेली.
कावीळने पीडित होती उमा
शांती विलियम्स म्हणाल्या की, उमा मागील काही महिन्यापासून कावीळ आजाराने पीडित होती असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यावर उपचार सुरू होते. परंतु अलीकडेच ती पूर्णपणे बरी होऊन घरी परतली होती. उमा माहेश्वरी आपल्यात नाही यावर माझा विश्वास बसत नाही. उमाचे पती मुरुगन हे पशु वैद्यकीय डॉक्टर आहेत. अनेक सेलेब्रिटीने सोशल मीडियावरुन उमा माहेश्वरीच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या.