९० चा काळ गाजवलेली ज्येष्ठ अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ५' मध्ये? चाहत्यांनीच केलं Confirm!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 10:04 AM2024-07-20T10:04:13+5:302024-07-20T10:05:17+5:30

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसण्याची दाट शक्यता निर्माण झालीय (Bigg Boss Marathi 5)

actress varsha usgaonkar will be seen in bigg boss marathi 5 riteish deshmukh | ९० चा काळ गाजवलेली ज्येष्ठ अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ५' मध्ये? चाहत्यांनीच केलं Confirm!

९० चा काळ गाजवलेली ज्येष्ठ अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ५' मध्ये? चाहत्यांनीच केलं Confirm!

सध्या 'बिग बॉस मराठी ५'ची उत्सुकता शिगेला आहे. 'बिग बॉस मराठी ५' चं होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. हळूहळू 'बिग बॉस मराठी ५'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं बाहेर येतीलच. पण अशातच ९० चा काळ गाजवणारी आणि सध्या मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री 'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. ही अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसणार वर्षा उसगावकर?

वर्षा उसगावकर सध्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत अभिनय करत आहेत. पण काल वर्षा यांनी ही मालिका सोडणार असल्याचं जाहीर केलं. वर्षा यांनी अचानक मालिका सोडल्याने चाहत्यांना धक्का बसला. पण याच चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून वेगळेच अंदाज लावायला सुरुवात केली. वर्षा यांनी 'बिग बॉस मराठी ५' साठी मालिका सोडली असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. 'वेलकम टू बिग बॉस', 'माई आता बिग बॉस सीझन पाचमध्ये दिसतील', अशा कमेंट लोकांनी केल्या आहेत. त्यामुळे वर्षा 'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसणार का हे काहीच दिवसात स्पष्ट होईल. 

या तारखेपासून सुरु होणार 'बिग बॉस मराठी ५'

मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, १०० दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त ७ दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या 'BIGG BOSS Marathi'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येतील. संपूर्ण महाराष्ट्राला  'बिग बॉस मराठी ५' पाहण्याची उत्सुकता आहे.
 

Web Title: actress varsha usgaonkar will be seen in bigg boss marathi 5 riteish deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.