Shiv Thakare : मी आहे सोबत नेहमी..., रडणाऱ्या शिव ठाकरेसाठी वीणा जगतापची स्पेशल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 10:27 AM2022-12-06T10:27:32+5:302022-12-06T10:28:38+5:30
Bigg Boss 16, Veena Jagtap, Shiv Thakare : शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्समध्ये अचानक निर्माण झालेल्या दुराव्यामुळे चाहते नाराज झाले होते. मात्र वीणानं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहते क्रेझी झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी 2’ घरात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि वीणा जगताप (Veena Jagtap ) यांच्यात प्रेम फुललं होत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही बराच काळ हे लव्ह बर्ड्स एकमेकांसोबत होते. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. अगदी वीणानं शिवच्या नावाचा काढलेला टॅटूही पुसला आणि सोशल मीडियावरील दोघांचे फोटोही डिलीट केलेत. यानंतर दोघंही पब्लिकली कधीच दिसले नाहीत. पण अखेर 2 वर्षांनी दोघांनी या लव्हबर्ड्सचं खरं प्रेम प्रेक्षकांसमोर आलं आहे. वीणानं स्वत: शिववरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
मराठमोळा शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16 ) गाजवतोय. हिंदी बिग बॉसमधील त्याचा वावर, त्याचा खेळ सर्वांनाच आवडतो आहे. त्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कालपरवा मात्र शिव बिग बॉसच्या घरात काहीसा भावुक झालेला दिसला. अगदी तो ढसाढसा रडला. सततचे वाद, भांडणं यामुळे शिवला एकटेपणा जाणवू लागला होता आणि प्रियजनांच्या आठवणीने तो बेजार झाला होता.
‘बिग बॉस 16’मध्ये फॅमिली विक टास्क दरम्यान घरच्यांविषयी बोलताना शिव ढसाढसा रडला. मला खूप एकट वाटत आहे असं त्यानं सांगितलं. तेव्हा तुला कोणाशी मिठी हवी आहे का? वीणाची चालेल का? असं बिग बॉसने त्याला विचारलं आणि वीणाचं नाव ऐकताच रडणाऱ्या शिवच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. पण शिवला रडताना बघून अनेकांचं मनं भरून आलं. वीणाच्या मनातील भावना देखील बाहेर आल्यात. मग काय? आता वीणानं सर्वांसमोर येत, शिववरचं प्रेम व्यक्त केलं.
शिव आणि बिग बॉस यांच्यातील संवादाची व्हिडीओ क्लिप वीणानं शेअर करत अखेर तिच्या मनातील प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं. शिवाय त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.‘वाघ आहेस तू, हग्स. रडू नाही अजिबात मी आहे सोबत नेहमी...’,असं म्हणत वीणानं शिवसाठी प्रेम व्यक्त करत खूप सारे हार्ट इमोजी देखील शेअर केलेत.
शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्समध्ये अचानक निर्माण झालेल्या दुराव्यामुळे चाहते देखील नाराज झाले होते. मात्र वीणानं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहते क्रेझी झाले आहेत.
काही दिवसांआधीच ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे हिने शिव आणि वीणा यांचं ब्रेकअप झालेलं नसल्याचं म्हटलं होतं. शिव आणि वीणा यांच्यात एक खास नातं आहे. दोघांना जेव्हा एकमेकांची गरज असते तेव्हा ते एकमेकांसाठी हजर असतात. शिव हा टीव्हीवर दिसण्यासाठी नाती जोडणारा नाहीये, असं मेघा म्हणाली होती. आता वीणाच्या पोस्टवरून त्यावर शिक्का मोर्तब झालायं, एवढंच...!