"तो एक नंबरचा नाटकी माणूस.."; घराबाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून छोटा पुढारीची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 01:20 PM2024-08-20T13:20:23+5:302024-08-20T13:20:56+5:30

योगिता चव्हाणने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत छोटा पुढारीबद्दल तिचं परखड मत व्यक्त केलंय (yogita chavan, bigg boss marathi 5)

actress yogita chavan comment on chota pudhari ghanashyam darode bigg boss marathi 5 | "तो एक नंबरचा नाटकी माणूस.."; घराबाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून छोटा पुढारीची पोलखोल

"तो एक नंबरचा नाटकी माणूस.."; घराबाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून छोटा पुढारीची पोलखोल

योगिता चव्हाण ही बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी होती. योगिताचं काहीच दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरातून एलिमिनेशन झालं. योगिता तीन आठवडे घरात होती. ती शांत असली तरीही तिने शेवटच्या काही दिवसांमध्ये चांगला खेळ खेळला. योगिताच्या खेळाचं रितेशभाऊंनीही कौतुक केलं. परंतु योगिताला बिग बॉस मराठीमधून एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत योगिताने छोटा पुढारी म्हणजेच घनःश्याम दरवडेची चांगलीच पोलखोल केलेली दिसली.

योगिताने घराबाहेर आल्यावर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, "एक नंबरचा नाटकी माणूस आहे तो. जेव्हा दुसऱ्या आठवड्याच्या एलिमिनेशनचा आदला दिवस होता. मी घनःश्याम यांना मदत करायला बोलावलं होतं. मला ते बोलत होते की, तुम्ही गेलात ताई तर मला कोण माया करणार. मी म्हटलं मी कधी माया केली तुम्हाला. माया वगैरे मी नाही कधी केली त्यांना. आमच्यात छान बोलणं, शेअरींग झालं असं काहीच नाही घडलं."


योगिता शेवटी म्हणाली, "निक्की आणि माझं थोडंफार शेअरींग झालंय. म्हणजे मी - निक्की काहीवेळा असे १० मिनिटं वगैरे पर्सनल बोललो आहोत. पण घनःश्यामबरोबर माझा असा एकही क्षण नाहीय. तो माणूस मला फेक वाटतो. ते काहीही बोलतात ते खरं नाही वाटत मला. त्या काही खऱ्या भावना नसतात, असं मला वाटतं. त्यामुळे मला असं झालं की, ज्या माणसाबरोबर माझं कनेक्शन नाही तो मला म्हणतोय तुम्ही गेलीत की माया कोण करणार?" 

Web Title: actress yogita chavan comment on chota pudhari ghanashyam darode bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.