'एकदम कडक'च्या मंचावर येणार आदर्श शिंदेंची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 14:16 IST2019-02-28T13:55:42+5:302019-02-28T14:16:24+5:30
एकदम कडकचा येत्या आठवड्याचा भाग बघताना प्रत्येकाला त्यांच्या लग्नाच्या गोड आठवणी पुन्हा एकदा आठवणार हे नक्की.

'एकदम कडक'च्या मंचावर येणार आदर्श शिंदेंची पत्नी
कलर्स मराठीवरील एकदम कडकच्या मंचावर आतापर्यंत सामना महाराष्ट्राचा, किनारा महाराष्ट्राचा या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना काही खास परफॉर्मन्स बघायला मिळाले. आता येत्या आठवड्यामध्ये एकदम कडकच्या मंचावर सजणार 'मांडव महाराष्ट्राचा'– थाट लग्नाचा अन् घुमणार नाद सनई चौघड्याचा ... म्हणजेच लग्न सराईची, गाणी, जागरण या गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. याचबरोबर कार्यक्रमामधील विनोदवीरांचे काही स्कीट देखील बघायला मिळणार आहेत.
एकदम कडकचा येत्या आठवड्याचा भाग बघताना प्रत्येकाला त्यांच्या लग्नाच्या गोड आठवणी पुन्हा एकदा आठवणार हे नक्की. लग्नाच्या वेळेस केलेली धम्माल मस्ती, घरच्यांनी केलेली तयारी, सत्यनारायणाची पूजा, गाणी, जागरण, हे सगळे या मंचावर पुन्हाएकदा बघायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांची आवडती वैशाली सामंत गोऱ्या गोऱ्या गालावरी हे सुंदर गाण सादर करणार आहे, तर मीरा जोशी हि पोरगी साजूक तुपातली या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. इतकेच नव्हे तर छगन चौघुले यांनी खंडेरायाच्या लग्नाला हे गाण सादर करणार तर सनई चौघडेचा आवाज मंचावर घुमणार आहे. मंचावर आदर्श शिंदे याची पत्नी देखील येत्या आठवड्यामध्ये येणार असून आदर्श खास गाणे देखील सादर करणार आहे. तसेच आदर्शची बायको त्यांची लव्हस्टोरी सांगणार असून साडी के लिये सॉरी हा गेम देखील खेळणार आहे. तसेच नवरा असावा तर असावा या कार्यक्रमामधील संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी हर्षदा खानविलकर मंचावर येणार आहेत. कार्यक्रमाच्या दरम्यानच्या अनेक आठवणी त्या सांगणार आहेत. याच निमित्ताने मंचावर 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये देखील येणार आहेत.