​ आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे घेऊन येत आहेत विठूमाऊली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2017 07:09 AM2017-07-05T07:09:37+5:302017-07-05T12:39:37+5:30

आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची विठूमाऊली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Adinath Kothare and Mahesh Kothare are coming with Vithu Mauli | ​ आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे घेऊन येत आहेत विठूमाऊली

​ आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे घेऊन येत आहेत विठूमाऊली

googlenewsNext
िनाथ कोठारे आणि महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन या प्रोडक्शन कंपनीने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत. आता हे प्रोडक्शन हाऊस आणखी एक मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव विठूमाऊली असून या मालिकेची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली. आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे यांनी आषाढी एकादशी निमित्त त्यांच्या फॅन्सना शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला होता. याच व्हिडिओद्वारे त्यांनी या मालिकेची घोषणा केली. 
अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला  माणूसपण चुकलेले नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे. त्याची अर्धांगिनी त्याच्या बाजूला पण त्याच्या सोबत नाही. कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी लवकरच 'विठूमाऊली' या मालिकेच्या रूपाने स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.
आजवर पंढरीची वारी आणि इतर अनेक चित्रपटातून संतांना दिसलेले विठ्ठलाचे रूप, विठ्ठलाची महती, विठ्ठलाचे प्रेम अशा कथा दाखवण्यात आल्या. मात्र संतांच्या आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावणाऱ्या साक्षात विठ्ठलालाही नियतीचा फेरा चुकला नाही. विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्यात नेमके काय घडले, प्रेमात मत्सराचे किल्मिष कुठून आले, रखुमाई विठ्ठलावर रुसून बाजूला का उभी राहिली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मालिकेत मिळणार आहेत. मालिकेतले कलाकार आणि इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. त्यासाठी 'विठूमाऊली' मालिकेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

 


Also Read : ​‘जर्नी टू दि सेंटर आॅफ दि हार्ट...’ - आदिनाथ कोठारे

Web Title: Adinath Kothare and Mahesh Kothare are coming with Vithu Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.