बेल्टनी मारायचा, शिवीगाळ करायचा...! ‘नागीन 2’ फेम आरजू गोवित्रीकरनं पतीवर केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:43 AM2021-08-05T10:43:48+5:302021-08-05T10:45:30+5:30
आरजू ही बॉलिवूडची एकेकाळची गाजलेली अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची बहीण आहे. आरजूने 2019 मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
‘नागीन 2’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरच्या (Arzoo Govitrikar) पर्सनल लाईफमध्ये सध्या काही फार ठीक नाही. आरजूने पती सिद्धार्थ सभरवालवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटसाठी अर्ज दाखल केलाय. तुम्हाला ठाऊक असेलच की आरजू ही बॉलिवूडची एकेकाळची गाजलेली अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची (Aditi Govitrikar) बहीण आहे. आरजूने 2019 मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. (Arzoo Govitrikar has accused her husband of domestic violence )
ई-टाईम्सशी संवाद साधताना आरजूने आपबीती सांगितली. ती म्हणाली,सिद्धार्थच्या दारूच्या व्यसनावरून आमचं भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान त्यानं मला जबर मारहाण केली होती. मला बाथरूमपर्यंत ओढत नेत त्यानं मला मारहाण केली होती. त्यानं माझ्या पोटात लाथ घातली. मला बेल्टनं झोडपून काढलं. मला घराबाहेर काढलं. माझ्या शरीरावर काळे निळे डाग पडले होते. माझ्या जखमा लोकांना दिसू नयेत म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते. तो मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करायचा. मी घरात काम करणारी मोलकरीण आहे, असं सांगायचा. इतकं सहन करूनही मी गप्प राहिले. स्वाभिमान बाजूला ठेवून त्याच्यासोबत राहिले. पण आता बास. आता मी शांत राहू शकत नाही. 2 वर्षे सर्व छळ सहन केला. आता मात्र मी थकलेय. आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती तेव्हा त्याने माज्यावर पहिल्यांदा हात उगालरा. त्यानंतर आम्हाला मुलगा झाल्यावर तो वेगळ्या खोलीत झोपू लागला. त्यानंतर, मला कळलं की त्याची एक रशियन गर्लफ्रेंण्ड आहे. तिच्याशी तो सतत चॅट करायचाय. आता ते एकत्र आहेत की नाही मला ठाऊक नाही कारण ते वेगळे राहायचे, असंही तिनं सांगितलं.