Aditi Malik : "मी माझा आवाज गमावला, ताप आणि अंगदुखी..."; अभिनेत्री पडली आजारी, दिले हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:30 IST2025-03-30T13:30:09+5:302025-03-30T13:30:39+5:30

Aditi Malik : अदितीची तब्येत सध्या ठीक नाही. सोशल मीडियावर तिने आजारी असल्याची माहिती दिली.

Aditi Malik shares health update battling coughing fever said lost my voice | Aditi Malik : "मी माझा आवाज गमावला, ताप आणि अंगदुखी..."; अभिनेत्री पडली आजारी, दिले हेल्थ अपडेट

Aditi Malik : "मी माझा आवाज गमावला, ताप आणि अंगदुखी..."; अभिनेत्री पडली आजारी, दिले हेल्थ अपडेट

अभिनेत्री अदिती मलिक ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक उत्तम शोमध्ये काम केलं आहे. अदितीची तब्येत सध्या ठीक नाही. सोशल मीडियावर तिने आजारी असल्याची माहिती दिली. अभिनेत्रीने नेब्युलायझरसोबत एक पोस्ट शेअर केली. अदिती मलिकने सोशल मीडियावर हेल्थ अपडेट दिले आहेत. 

"काय आठवडा होता तो... सतत खोकला. माझं नाक जणू काही ट्रॅफिक जाम असल्यासारखं बंद झालं आहे. ताप आणि अंगदुखी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझा आवाज गमावला. आज मला बरं वाटत आहे. मला आशा आहे की, उद्यापर्यंत मीही बोलू शकेन. घरगुती उपचार आणि औषधांसह हे एक मिशन वाटतं आहे. शेवटी नेब्युलायझर आणि झोपेमुळे खूप मदत झाली" असं अदितीने म्हटलं आहे.

अभिनेत्रीचं लग्न अभिनेता मोहित मलिकशी झालं आहे. एका मालिकेत काम करत असताना दोघेही प्रेमात पडले. १ डिसेंबर २०१० रोजी त्यांचं लग्न झालं. २०२० मध्ये त्यांना मुलगा झाला. अभिनेत्री आता टीव्ही जगतापासून दूर आहे. 

अदिती तिच्या मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. सोशल मीडियाद्वारे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत राहते. ती एक बिझनेसवुमन आहे. अदिती मुंबईत एक रेस्टॉरंट चालवते. अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध शोमध्ये काम केलं आहे. 
 

Web Title: Aditi Malik shares health update battling coughing fever said lost my voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.