अदिती शर्माने लग्नमंडपातून केले 'या' अभिनेत्रीच्या स्टाईलने पलायन…!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 05:49 AM2018-04-14T05:49:58+5:302018-04-14T14:23:20+5:30
चांगला पती मिळावा, यासाठी सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी उपवर मुलींना विविध कला शिकवून आपल्यात बदल घडवून आणण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या ...
च ंगला पती मिळावा, यासाठी सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी उपवर मुलींना विविध कला शिकवून आपल्यात बदल घडवून आणण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक शाळांचे पेव पंजाबमध्ये फुटले आहे. पण आपण जशा आहोत, तसेच आपल्याला आपल्या भावी पतीने स्वीकारले पाहिजे, यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मीरा (अदिती शर्मा) नावाच्या मुलीची कथा ‘झी टीव्ही’वरील ‘कलीरें’ या मालिकेत चित्रीत करण्यात आली आहे. मीराला तिच्या या प्रवासात साथ देण्यासाठी विवान (अरिजित तनेजा) हा लंडनस्थित उद्योगपती येतो, जो आपले एक कौटुंबिक गुपित शोधण्यासाठी पंजाबमध्ये आलेला असतो. पण मालिकेच्या अलीकडच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मीराचे कुटुंबीय तिचे लग्न सुमेरशी (परमवीरसिंग चीमा) लावण्याची तयारी करीत असतात.
‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात अभिनेत्री कॅटरिना कैफने साकारलेल्या वधूसारखीच व्यक्तिरेखा या मालिकेत अदितीने रंगविली आहे. मीरा ही एक स्वच्छंदी आणि आनंदी स्वभावाची मुलगी असून तिला भारतीय परंपरेच्या चोकटीतील वधू बनण्यात स्वारस्य नसते. तिला तिचे जीवन मुक्तपणे आणि आपल्या मर्जीनुसार जगायचे असते. मीरा ती स्पष्टवक्ती असून तिला आपले व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कोणासाठी किंवा सामाजिक दबावामुळे बदलण्याची इच्छा नसते. सुमेरबरोबरच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येते, तशी मीराला सुमेरच्या व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू दिसून येते. त्यामुळे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात अभिनेत्री कॅटरिना कैफने ज्याप्रमाणे मोटाररबाईकवरून लग्नापूर्वी पलायन करते, तसेच मीराही करते. अतिशय भरजरी लालभडक रंगाचा लेहेंगा परिधान केलेली मीरा वधूचा चूडा आणि कलीरें अंगावर असतानाच सुमेरच्या तावडीतून सुटण्यासाठी लग्नमंडपडातून पलायन करते.
“यातील माझी व्यक्तिरेखा ही स्पष्टवक्त्या मुलीची असून ती सामाजिक बंधनं मानीत नाही. ‘कलीरें’ मालिकेमुळेच मला आयुष्यात प्रथमच नववधूच्या वेशात नटण्याची संधी मिळाली असून यात मी लालभडक लेहेंगा, भारी दागिने आणि अर्थातच कलीरें यांच्यासह लग्नापूर्वी पळ काढते. सध्या मालिकेत माझ्या लग्नाचंच कथानक सुरू असलं, तरी बाईकवरून पळ काढम्याचा हा प्रसंग मला विशेष थरारक वाटला आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटातील कॅटरिनाच्या प्रसंगाप्रमामेच मला हा प्रसंग उभा करायचा होता, ही गोष्टही माझ्यासाठी खास महत्त्वाची होती. मी कॅटरिना ची फार मोठी चाहती असून मला तिचा फिटनेस आणि फॅशनची शैली फार आवडते. बाईकवरील प्रसंगाचं चित्रीकरण करताना मला खूप मजा आली आणि आता प्रेक्षकांना माझ्या लग्नातील हा नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला आवडेल, अशी आशा करते,” असे अदिती शर्मा म्हणाली.