आदित्य कपाडिया आणि तन्वी ठक्कर हे रिअल लाइफ कपल झळकणार चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 07:25 AM2017-04-29T07:25:45+5:302017-04-29T12:55:45+5:30
जस्ट मोहोब्बत, शाका लाका बूम बूम यांसारख्या मालिकामध्ये आदित्य कपाडिया बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने बडे अच्छ लगते ...
ज ्ट मोहोब्बत, शाका लाका बूम बूम यांसारख्या मालिकामध्ये आदित्य कपाडिया बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने बडे अच्छ लगते है, अलादत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. आता तो एका चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा एक गुजराती चित्रपट असून या चित्रपटात तन्वी ठक्कर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तन्वी आणि आदित्य हे खऱ्या आय़ुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात असून त्यांचा साखरपुडादेखील झालेला आहे.
एक दुसरे से या मालिकेत या दोघांनी भावा-बहिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवरच त्या दोघांची भेट झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 2013मध्ये साखरपुडा केला.
तन्वीनेदेखील नुकतेच बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत काम केले होते. तसेच सध्या आदित्य श्रीदेवीया या मालिकेत झळकत आहे. आता त्या दोघांनाही एकत्र काम करायला मिळत असल्याने ते दोघेही खूप खूश आहेत. ते दोघे एका कॉमेडी गुजराती चित्रपटात काम करणार असून नायक-नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्याशिवाय अमर उपाध्याय, टिकू तलसानिया यांच्यादेखील या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. याविषयी तन्वी सांगते, माझा हा पहिलाच चित्रपट असल्याने मी या चित्रपटात काम करण्यास खूप उत्सुक आहे. आमच्या दोघांची खऱ्या आय़ुष्यातील केमिस्ट्री खूपच चांगली असल्याने प्रेक्षकांना ती चित्रपटातदेखील पाहायला मिळणार आहे. आम्ही दोघेही गुजराती आहोत. पण मला गुजराती अस्खलित बोलता येत नाही. पण त्यासाठी मला आदित्य मदत करत आहे. सगळ्या टीमसोबत काम करायला खूपच मजा येत आहे.