मुलगी झाली हो....! आदित्य नारायण झाला बाबा, पत्नी श्वेता अग्रवालने दिला गोंडस मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:13 AM2022-03-04T11:13:14+5:302022-03-04T11:14:31+5:30

गायक-अभिनेता आदित्य नारायण(Aditya Narayan)च्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे.

Aditya narayan shweta agrawal blessed with baby girl | मुलगी झाली हो....! आदित्य नारायण झाला बाबा, पत्नी श्वेता अग्रवालने दिला गोंडस मुलीला जन्म

मुलगी झाली हो....! आदित्य नारायण झाला बाबा, पत्नी श्वेता अग्रवालने दिला गोंडस मुलीला जन्म

googlenewsNext

गायक-अभिनेता आदित्य नारायण(Aditya Narayan)च्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. आदित्य बाबा झाला आहे. त्याची पत्नी श्वेता अग्रवाल हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आदित्य आणि श्वेता एका मुलीचे आई-वडील झाले आहेत. श्वेताने 24 फेब्रुवारीला आदित्य आणि श्वेताला कन्यारत्न झाले.  आदित्यने सांगितले की त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने त्याचे ऐकले.काही वेळा पूर्वीच आदित्यने सोशल मीडियावर मुलगी झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आदित्य आणि श्वेतावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. गेल्या वर्षी आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून श्वेताच्या प्रेग्नेंसीची माहिती दिली होती. 
 
आदित्य नारायणने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, श्वेताला बघून म्हणायचे की मुलगा होईल पण आम्हाला मुलगी होईल अशी आशा होती. मला विश्वास आहे की मुली त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ आहेत आणि मला खूप आनंद झाला की आमच्या घरी परी आली आहे. श्वेता आणि मला खूप आनंद आहे की आम्ही आता आई-बाबा झालो आहोत.

मुलीच्या जन्माबाबत बोलताना आदित्यने सांगितले की, डिलेव्हरी दरम्यान श्वेतासोबत होतो आणि मला वाटते की स्त्रिया बाळाला जन्म देण्यासाठी प्रचंड ताकद दाखवतात. माझं श्वेतावरच आदर आणि प्रेम आता डबल झालं आहे. जेव्हा एखादी स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. 
आदित्यने सांगितले की, त्याच्या मुलीचा संगीताचा प्रवास आधीच सुरू झाला आहे. मी आतापासून तिच्यासाठी गाणी म्हणायला सुरुवात केली आहे. संगीत त्याच्या DNA मध्ये आहे. 


 

Web Title: Aditya narayan shweta agrawal blessed with baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.