मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन' म्हणत अद्वैत दादरकरचा Zee मराठीला अलविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 04:49 PM2023-09-19T16:49:25+5:302023-09-19T16:50:35+5:30
अद्वैतने सोशल मिडीयावर पोस्ट करुन झी मराठीच्या फिक्शन हेड पदाच्या जबाबदारीतून मोकळा झाल्याची माहिती दिली.
लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकरने मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अद्वैत हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आपल्या कामासंदर्भातील तसेच व्यक्तिगत आयुष्यातील काही घटनांचे अपडेट अद्वैत त्याच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना देत असतो. नुकतचे अद्वैतने सोशल मिडीयावर पोस्ट करुन झी मराठीच्या फिक्शन हेड पदाच्या जबाबदारीतून मोकळा झाल्याची माहिती दिली.
त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "झी मराठी...माझ्या साठी हा चॅनल नाही..Emotion होती..आहे आणि यापुढेही असेल..स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी कधी Corporate Job करेन..पण 9 मार्च 2022 ते 19 सप्टेंबर 2023..साधारण दीड वर्ष केला बाबा..Zee Marathi - Fiction Head.. एवढी मोठी जबाबदारी..त्या साठी सर्वात आधी माझ्या वर एवढा विश्वास दाखवला म्हणून PM Sir, अमीत सर,निलेश मयेकर,कल्याणी सगळ्यांचे मनापासुन आभार".
पोस्टमध्ये पुढे तो म्हणाला, "ह्या संपूर्ण दीड वर्षात प्रचंड काम केलं..कधी थकलो..कधी समाधान मिळालं..कधी यश मिळालं..जास्त अपयशच मिळालं..धडपडलो..भांडलो..वाद घातला..कधी कठोर निर्णय घ्यावे लागले..ह्या सगळ्यात एक माणूस म्हणून घडलो..हे सगळे अनुभव..नवीन जग..गोष्ट सांगण्याची प्रत्येक वेळेला नवीन पद्धत शोधणं..गोष्टीच्या..पात्रांच्या..त्यांच्या भावनांच्या खोलात शिरून..प्रेक्षकांना खरेपणाचा..अस्सल अनुभव देण्या साठी झी मराठी नेहमीच झगडते तसे आम्ही सुद्धा झगडलो..ही सगळी माणसं माझ्या नुसती आयुष्यात आली नाहीत..तर आयुष्याचा भाग बनली..आणि शेवटी आठवणी माणसच तयार करतात".
"झी मधल्या प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या प्रत्येकाला thank you so much.. आणि fiction team तुम्हाला विशेष thanks..तुम्ही सुद्धा तुमचा बॉस म्हणून मला अगदी सहज स्वीकारलत..खूप miss करेन सगळ्यांना..आत्ता प्रत्येक what's app group मधून बाहेर पडताना सुद्धा हात जड झाले काही सेकंद.. डोळ्यात पाणी आलच..आपण टीम म्हणून एकत्र केलेलं काम.. मजा मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन..कधी कोणाला दुखावलं असेन तर Sorry आणि ह्या संपूर्ण गोड अनुभवासाठी सगळ्यांचे मनापासून आभार..मला खात्री आहे..लवकरच झी मराठी चे जुने दिवस..तो अभिमान..सगळं परत येईल..All the best आणि मी मराठी..झी.मराठी",असे त्याने पोस्टमध्ये लिहलं.
अद्वैत केवळ एक अभिनेताचं नाही तर एक दिग्दर्शक आणि लेखकही आहे. झी मराठीवरीलच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम करत होता. त्यातील त्याची सौमित्र ही व्यक्तिरेखा विशेष लोकप्रिय ठरली होती. शिवाय, तो 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत झळकला होता.