लोकप्रिय अभिनेत्याचं 11 वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण; अलिकडेच केलंय हिंदी अभिनेत्रीशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 06:10 PM2024-03-07T18:10:16+5:302024-03-07T18:10:36+5:30

Akshay mhatre:अक्षय लवकरच 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत झळकणार आहे.

After 11 years the popular actors debut in the Marathi tv serial | लोकप्रिय अभिनेत्याचं 11 वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण; अलिकडेच केलंय हिंदी अभिनेत्रीशी लग्न

लोकप्रिय अभिनेत्याचं 11 वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण; अलिकडेच केलंय हिंदी अभिनेत्रीशी लग्न

छोट्या पडद्यावर सध्या 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेची जोरदार चर्चा  सुरु आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अक्षय म्हात्रे तब्बल ११ वर्षांनंतर झी मराठीवर पदार्पण करत आहे. अलिकडेच त्याने या मालिकेनिमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने या मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

"११ वर्षापूर्वी मराठी मालिकांपासूनच माझ्या करिअरची सुरुवात झाली. टेल-अ-टेल या मीडिया प्रोडक्शन हाऊसच्या मालिकेत मी पहिल्यांदा झळकलो होतो. त्यानंतर पुन्हा त्यांच्याच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत काम करायची संधी मिळत आहे. माझ्या करिअरची सुरुवात मराठी मालिकेतून झाली आणि कुठेतरी मनात होतं की परत मराठी मालिकेत काम करायचंय. दुसरं कारण म्हणजे माझे घरचे आणि नातेवाईक जे नेहमी म्हणायचे की मराठी मालिका कर.  हा योग जुळून आल्यामुळे मी खुश आहे. लग्नाच्या तयारीसाठी मी ब्रेक घेतला होता तेव्हा मला सरांचा कॉल आला की भेटायला ये. त्यांना भेटलो  त्यांनी मला कथानक  सांगितले मी ऑडिशन दिली आणि सगळं घडत गेलं, असं अक्षय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला असं वाटत की जर मला दोन-तीन भाषांमध्ये काम करायला मिळत असेल तर त्यात माझाच फायदा आहे. माझ्या पात्राच नाव आहे आकाश असं असून ही खूप वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे.  दोन छोट्या मुलींच्या वडिलांची भूमिका साकारशील का असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. आणि, मी लगेच होकार दिला. कारण भूमिका चांगली असेल तर काय हरकत आहे?  मी खऱ्या आयुष्यात अजून बाबा झालो नाहीये पण दोन लहान मुलींचा बाबा होण्याच्या त्या भावना व्यक्त करण्याचं आव्हान एक्सायटिंग आहे माझ्यासाठी."

Web Title: After 11 years the popular actors debut in the Marathi tv serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.