तब्बल ४ वर्षांनी 'आई कुठे काय करते' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या तारखेला शेवटचा एपिसोड?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:32 AM2024-02-12T11:32:22+5:302024-02-12T11:34:23+5:30
स्टार प्रवाहरील लोकप्रिय 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे (aai kuthe kay karte marathi serial goes off air star pravah
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही स्टार प्रवाहवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका. २०१९ ला सुरु झालेली मालिका आजही TRP मध्ये टॉपवर आहे. आजही ७.३० वाजले की सहकुटुंब ही मालिका पाहिली जाते. 'आई कुठे काय करते' मालिकेतील सर्व कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. पण 'आई कुठे काय करते' मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी. तब्बल ४ वर्षांनी 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे.
'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे. या मालिकेच्या जागी 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका सुरु होणार आहे. नुकतंच 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची वेळ समोर आलीय. ही मालिका १८ मार्च पासून रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर टेलिकास्ट होणार आहे. यामुळे गेली ४ वर्ष साडे सातला प्रसारित होणारी 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विशेष गोष्ट म्हणजे, स्टार प्रवाहवर अनेक नव्या-जुन्या मालिका प्रसारित झाल्या. त्यामुळे अनेक मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले. पण गेली ४ वर्ष 'आई कुठे काय करते' मालिका ७.३० वाजता अव्याहतपणे सुरु आहे. आता ७.३० वाजता 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका सुरु होणार असल्याने 'आई कुठे काय करते' मालिका निरोप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे १६ किंवा १७ मार्चला मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होईल.