अभिनयानंतर ही अभिनेत्री वळली दिग्दर्शनाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:06 PM2018-11-05T16:06:06+5:302018-11-05T16:12:24+5:30
अभिनेत्री स्वाती सेमवाल हिने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. स्वातीने नुकतेच "डिड्लो ला रे" या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
अभिनेत्री स्वाती सेमवाल हिने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. स्वातीने नुकतेच "डिड्लो ला रे" या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. "डिड्लो ला रे" ही रुढीवादी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील बहिणींची गमतीदार कथा आहे. यात "डिड्लो"विषयी फँटसीजचा शोध घेत रहातात, ज्यामध्ये त्यांना मित्रपरिवाराची मदत मिळते. यात आंचल शर्मा आणि प्रियांका आर्या यांची प्रमुख भूमिकेत दिसतील."डिड्लो ला रे"मध्ये स्त्रियांच्या लैंगिकतेवर भाष्य करण्यात आले आहे. स्वाती म्हणते याविषयावर खुलेपणे बोलले पाहिजे. दडपणशाही वृत्ती, महिलांच्या बाबतीत असलेला एकसुरीपणा यांना वाचा फोडण्याचा स्वातीचा प्रयत्न आहे.
काही दिवसांपूर्वीच स्वातीने कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’सिनेमा अर्धवट सोडला होता. स्वाती या चित्रपटात सोनू सूदच्या पत्नीची भूमिका (सदाशिवराव भाऊची पत्नी पार्वती) साकारताना दिसणार होती.सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला किती महत्त्व मिळेल, याबद्दल मी साशंक होते. आधी चित्रपट सोडण्याबद्दल माझ्या मनात गोंधळ होता. यानंतर मी माझ्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेअंती ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ सोडण्याचा निर्णय पक्का केला, असे स्वातीने सांगितले. कंगना राणौत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 150 कोटींपेक्षा जास्त आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.