अनिल कपूरनंतर या टीव्ही अभिनेत्याला बनवा एक दिवसाचा मुख्यमंत्री, चाहत्यांनीच दिला सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:49 AM2019-11-06T11:49:50+5:302019-11-06T11:50:13+5:30

या मिम्सवर सडेतोड उत्तर दिले. त्याच्या उत्तराकडे लक्ष देता तो मालिकेतील मुख्यमंत्रीचं पद मात्र नक्की मिळणार यात शंकाच नाही.

After Anil Kapoor,TV Actor Tejas Barve Should Become one day CM, fans Give Advice | अनिल कपूरनंतर या टीव्ही अभिनेत्याला बनवा एक दिवसाचा मुख्यमंत्री, चाहत्यांनीच दिला सल्ला !

अनिल कपूरनंतर या टीव्ही अभिनेत्याला बनवा एक दिवसाचा मुख्यमंत्री, चाहत्यांनीच दिला सल्ला !

googlenewsNext


'मुख्यमंत्री कोण होणार?' या एका प्रश्नावर राजकीय कलगीतुरा रंगला असतानाच, महाराष्ट्राच्या जनतेने मात्र सुमीला मिसेस मुख्यमंत्री, म्हणजेच पर्यायाने समरसिंहना मुख्यमंत्री बनवा असं गमतीत सुचवलंय. सोशल मीडियावर 'बोलो, बनोगे एक दिन के लिये मुख्यमंत्री?' या अनिल कपूर यांच्या 'नायक' चित्रपटातल्या या डायलॉगने सध्या धुमाकूळ घातला आहे. 


हाच प्रश्न आणि प्रसार माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मिम्सबद्दल समरसिंह म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेला विचारल असताना तो म्हणाला, "जर मी मुख्यामंत्री झालो तर सर्वात आधी मी माझा कार्यकाळ वाढवून घेईन. कारण जर-तर का होईना, मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळतेच आहे, तर ती कोण दवडेल? आणि व्यावहारिकदृष्ट्या मुख्यमंत्री म्हणून एका दिवसात काम करणं शक्य नाही. ते फक्त चित्रपटातच घडू शकतं. त्यामुळे कार्यकाळ वाढवला, कि राज्यातील जनतेमध्ये एकात्मता आणण्यासाठी शक्य ते निर्णय घेईन. 


जात, धर्म, आर्थिक विषमता यातून बाहेर पडत लोकांनी आज एकत्र आनंदी वातावरणात वावरायला हवं. माझा दुसरा निर्णय अर्थात भ्रष्टाचाराच्या विरोधात घेईन. अनेक सक्षम तरुण यामुळे मागे पडत आहेत, पर्यायाने देशसुद्धा. त्यामुळे मला प्राधान्यानं या विषयाकडे लक्ष द्यायला आवडेल. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावण्याऐवजी प्रत्येक शेतकरी इतरांना कर्ज देण्याइतपत सक्षम कसा होईल हे मी पाहेन."

तेजसने या मिम्सवर सडेतोड उत्तर दिले. त्याच्या उत्तराकडे लक्ष देता तो मालिकेतील मुख्यमंत्रीचं पद मात्र नक्की मिळणार यात शंकाच नाही.

Web Title: After Anil Kapoor,TV Actor Tejas Barve Should Become one day CM, fans Give Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.