Bigg Boss 17 ला TRP मिळाल्यानंतर शोमध्ये आणला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना द्यावी लागणार अग्निपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 13:11 IST2023-11-14T13:08:32+5:302023-11-14T13:11:28+5:30
Bigg Boss 17 : बिग बॉसने शोमध्ये मोठे बदल केल्यानंतर हा खेळ रंजक बनला आहे. वाइल्डकार्ड एंट्री सादर करण्यापासून ते रूममेट्समध्ये फेरबदल करण्यापर्यंत, निर्मात्यांनी बिग बॉस सीझन १७ मध्ये ड्रामा वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

Bigg Boss 17 ला TRP मिळाल्यानंतर शोमध्ये आणला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना द्यावी लागणार अग्निपरीक्षा
बिग बॉसने शोमध्ये मोठे बदल केल्यानंतर हा खेळ रंजक बनला आहे. वाइल्डकार्ड एंट्री सादर करण्यापासून ते रूममेट्समध्ये फेरबदल करण्यापर्यंत, निर्मात्यांनी बिग बॉस सीझन १७ मध्ये ड्रामा वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे यांच्या शाब्दिक युद्धापासून सलमान खान खानजादीला फटकारण्यापर्यंत हा शो चर्चेत राहिला आहे.
खानजादी उर्फ फिरोझा खान मनारा चोप्राशी भांडण करत असताना सलमान खानने टीका केली. बॉलिवूड सुपरस्टारने तिला आठवण करून दिली की कतरिना कैफ स्पर्धकांसोबत दिवाळी २०२३ साजरी करण्यासाठी आली आहे, परंतु ती लढण्यात आणि राईचा पर्वत करण्यात व्यस्त होती. बिग बॉस १७ नामांकनांपूर्वी, निर्मात्यांनी आगामी भागाची झलक देण्यासाठी एक स्फोटक प्रोमो रिलीज केला.
विकीवर नाराज झाली अंकिता
बिग बॉसने विकीला 'दिमाग' रूममध्ये पाठवल्यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात वाद झाला. पती बाहेर गेल्याने अभिनेत्री नाराज होती, तर विकी त्याच्या नवीन रूममेट्ससोबत मस्ती करताना दिसला. याचा राग अंकिताला आला. गेल्या आठवड्यात, बिग बॉस १७ मध्ये नऊ स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले होते. ऐश्वर्या शर्मा, अंकिता लोखंडे, अनुराग डोवाल, नील भट्ट, सनी आर्य, अरुण श्रीकांत, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा आणि नवीद सोले हे डेंजर झोनमध्ये होते.