सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:46 IST2020-06-30T15:21:46+5:302020-06-30T15:46:27+5:30
अंकिता आणि विक्कीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.

सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या लव्हस्टोरीला पवित्रा रिश्ताच्या सेटवर सुरुवात झाली. दोघांची ओळख या शोच्या माध्यमातून झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांची जोडीला फॅन्सचे देखील भरभरुन प्रेम मिळाले. सात वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. सुशांत अंकिताच्या ब्रेकअपची बातमी कळल्यावर त्यांच्या फॅन्सना जोरदार झटका लागला होता. दोघांच्या ब्रेकअपचे नेमकं कारण कधीच समोर आले नाही.
सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अंकिता आतून तुटली होती. काहीवेळासाठी ती लाईमलाईटपासून दूर गेली होती. काही वर्षांनंतर तिच्या आयुष्यात विक्की जैनच्या रुपाने नव्याने प्रेम आले.
अंकिता आणि विक्कीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. काही भेटीनंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. अंकिता विक्कीसोबतचे रोमाँटीक फोटो शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी अंकिताने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, लॉकडाऊनमध्ये ती विक्कीला मिस करतेय. विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मणिकर्णिका चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.