'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे पुन्हा आले एकत्र, दिसणार नव्या शोमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:47 IST2025-01-04T15:47:00+5:302025-01-04T15:47:32+5:30
Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike And Shreya Bugde :'चला हवा येऊ द्या' शोनंतर कुशल आणि श्रेया पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून ते दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे पुन्हा आले एकत्र, दिसणार नव्या शोमध्ये?
झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा शो बंद झाला असला तरी प्रेक्षकांच्या मनातले स्थान कायम आहे. या शोमधून अनेक विनोदवीर घराघरात पोहचले. यातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे(Shreya Bugde)देखील प्रसिद्धीझोतात आले. दरम्यान चला हवा येऊ द्या शोनंतर कुशल आणि श्रेया पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून ते दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.
कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्रेयाने ब्लॅक रंगाचा को-ऑर्ड सेट घातला आहे. तर कुशलने ब्लॅक पॅण्ट, नियॉन ग्रीन रंगाचा टीशर्ट आणि लेदरचे जॅकेट परिधान केले आहे. दोघांनी गॉगल घातला आहे. ते दोघे स्टायलिश अंदाजात दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, बॅक टू बेसिक. झी मराठीच्या अधिकृत अकाउंटला या पोस्टमध्ये मेंशन केले आहे. शूटिंग दिवस असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे या पोस्टवरून समजते की, कुशल आणि श्रेया शूटिंगसाठी एकत्र आले आहेत. आता ते दोघे नेमके कोणत्या शोमध्ये दिसणार हे कळू शकलेले नाही. मात्र त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहून खूश झाले आहेत.
दरम्यान, कुशल आणि श्रेया एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी 'चला हवा येऊ द्या' शोमधून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता ते कोणत्या शोमध्ये पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.