फरहा खानच्या जागी मिका सिंगची एंट्री, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:04 PM2021-09-03T12:04:22+5:302021-09-03T12:12:36+5:30

गेल्या वेळी मी याच कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी झालो होतो आणि त्यावेळी फरहा खानबरोबर मी खूपच मजेशीर वेळ घालवला होता. त्यामुळे यावेळी मला या कार्यक्रमात तिची उणीव निश्चितच भासत असल्याचे मिका सिंगने म्हटलंय.

After Farah Khan tests positive for COVID-19, Mika Singh steps in for the ace filmmaker on Zee Comedy Show | फरहा खानच्या जागी मिका सिंगची एंट्री, हे आहे कारण

फरहा खानच्या जागी मिका सिंगची एंट्री, हे आहे कारण

googlenewsNext

कोरोना विषाणूचे संकट संपता संपत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना धडकी भरवत आहे. कोरोनामुळे इतर क्षेत्राप्रमाणे मनोरंजनसृष्टीलाही मोठा फटका बसला आहे. नैराश्याचे वातावरण दूर करण्यासाठी छोट्या पडद्यावर  ‘झी कॉमेडी शो’ रसिकांच्या चेह-यावर हसू उमलण्यासाठी सुरु झाल होता. या शोमध्ये  फरहा खानच्या तिरकस टिप्पण्यांनी रसिकांना हसून हसून लोपटपोट करत होती. लाफिंग बुध्दा म्हणून ओळखली जाणारी फरहा खानलाच कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे फरहान खानचे दोन्ही  लसींचे घेऊन झाले होते. खबरदारी म्हणून काटेकोरपणे सेटवरही प्रत्येकाची काळजी घेतली जात होती. तरीही फराहला  कोरोना विषाणूचा संसर्ग झालाच.


फरहा सध्या घरीच क्वॉरंटाईन आहे. त्यामुळे काही दिवस  फरहा शोमध्ये झळकणार नाही. तिची जबाबदारी  मिकासिंग पार पाडताना दिसणार आहे. 11 सप्टेंबरपासून दोन आठवड्यासाठी ‘झी कॉमेडी शो’मध्ये फरहा खानची जागा मिकासिंग घेणार आहे.मिकासिंगने रविना टंडन आणि मल्लिका शेरावत या अभिनेत्रींसोबत दोन भागांचे चित्रीकरण पूर्ण केले असले, तरी कार्यक्रमात त्याला फरहा खानची उणीव भासत आहे.

यासंदर्भात मिकासिंग म्हणाला, “कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावरही फरहा खानला कोविड-19 विषाणूचा संसर्ग झाला, ही खरोखरच एक चिंतेची बाब आहे. सध्याच्या काळात कोणत्याच गोष्टींची खात्री देता येत नाही, हेच यावरून दिसून येतं. मी तिच्याशी बोललो असून ती तशी ठीक आहे, हे ऐकून मला दिलासा मिळाला. ती यातून लवकर बरी होवो, अशी प्रार्थना करतो. 

गेल्या वेळी मी याच कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी झालो होतो आणि त्यावेळी फरहा खानबरोबर मी खूपच मजेशीर वेळ घालवला होता. त्यामुळे यावेळी मला या कार्यक्रमात तिची उणीव निश्चितच भासत आहे. पण शो मस्ट गो ऑन, हे तत्त्व तुम्हाला ठाऊकच आहे आणि म्हणूनच सध्याच्या या निराशाजनक काळात लोकांच्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करण्यासाठी आम्ही झी कॉमेडी शोच्या दोन भागांचं चित्रीकरण रविना टंडन आणि मल्लिका शेरावत यांना घेऊन केलं आहे. यातील सर्व विनोदवीरांनी आपल्या विनोदी स्किट्सने आम्हाला मनसोक्त हसवलंंय. येते दोन आठवडे माझ्या विनोदी टिप्पण्या आणि संगीताद्वारे मी रसिकांच मनोरंजन करेन रसिकांनाही मला नवीन भूमिकेत पाहणे आवडेल अशी आशा करतो. 

Web Title: After Farah Khan tests positive for COVID-19, Mika Singh steps in for the ace filmmaker on Zee Comedy Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.