किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:59 IST2022-04-16T15:57:53+5:302022-04-16T15:59:06+5:30
Mulagi Jhali Ho: एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा 'मुलगी झाली हो' मालिका चर्चेचा विषय ठरत आहे.

किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत येते आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र त्यानंतर वाहिनीने ही मालिका दुपारी प्रसारित होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या मालिकेतील दोन कलाकरांनी या मालिकेला रामराम केला आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही मालिका सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबिकर(Shweta Ambikar)ने ही मालिका सोडल्याचे समोर येत आहे.
श्वेता आंबिकर मुलगी झाली हो या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती. ‘मराठी सिरियल्स’ने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील आर्याचे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता आंबिकर हिने ही मालिका सोडली आहे. तिने ही मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मुलगी झाली हो या मालिकेच्या सुरुवातीपासूनच आर्या हे पात्र खूप लोकप्रिय ठरले होते. मालिका सोडण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र अवघ्या एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा ही मालिका चर्चेचा विषय बनली आहे.